रत्नागिरी-रत्नागिरी बस स्थानकासाठी आणखी 7 कोटी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरी बस स्थानकासाठी आणखी 7 कोटी मंजूर
रत्नागिरी-रत्नागिरी बस स्थानकासाठी आणखी 7 कोटी मंजूर

रत्नागिरी-रत्नागिरी बस स्थानकासाठी आणखी 7 कोटी मंजूर

sakal_logo
By

rat८p१८.jpg-KOP२२L५५२११
रत्नागिरी- रखडलेल्या हायटेक बसस्थानकाच्या कामाची पाहणी करताना उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि अधिकारी.


रत्नागिरी बस स्थानकास आणखी ७ कोटी मंजूर
उदय सामंत; नुतनीकरण कामाला सुरवात
रत्नागिरी, ता. ८ : चार वर्षे रखडलेले रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठेकेदाराने मागितलेली वाढीव ७ कोटीची रक्कम शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे बसस्थानकाचे प्राथमिक काम सुरू झाले असून
येत्या आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी
दिली.
मंत्री सामंत यांनी आज सकाळी हायटेक बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाला भेट दिली. यावेळी एसटीचे अधिकारी उपस्थित होते. बांधकाम रखडण्याला वाढीव निधी कारणीभूत होता. कोरोनानंतर साहित्याच्या किंमती वाढल्यामुळे काम ठप्प झाले होते. सात ते आठ कोटी रुपये वाढीव रक्कम लागणार होती. त्यामुळे सुमारे १० कोटीचे काम सतरा ते अठरा कोटींवर गेले आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही भेट दिली होती.
आज सामंत यांनी भेट देऊन पाहणी केली. अडीच वर्षे वाढीव निधीची तरतूद व्हावी यासाठी सामंत प्रयत्न करीत होते. परंतु निधी उपलब्ध होत नव्हता.
सामंत म्हणाले, ‘रत्नागिरी हायटेक बसस्थानकाला लागणारा वाढीव निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. सुमारे ७ कोटी रुपये वाढीव निधी आहे. पूर्वीचा १० कोटी आणि हा ७ असा एकूण १७ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याने हायटेक बसस्थानकाचे काम आठ दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू होईल.’

चौकट-
आठ दिवसात मिऱ्या बंधाऱ्याचे काम सुरू
मिऱ्या बंधाऱ्याच्या १६० कोटीच्या कामास मंजूर होऊन आठ महिने झाले तरी ठेकेदाराने कामाला सुरू केलेले नाही. पत्तन विभागाने याची गंभीर दखल घेऊन १८ लाखाचा दंड ठेकेदाराला केला आहे. मिऱ्या बंधाऱ्याचे काम आता सुरू होणार असून ठेकेदार दंड भरणार आहे. आठ दिवसात मिऱ्या बंधाऱ्याचेही काम सुरू होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

चौकट
तारांगण लवकरच उपलब्ध
तारांगणातील काही यंत्रणा बसवण्याचे काम सुरु आहे. पाऊस अद्याप सुरू असल्याने त्या यंत्रणांची टेस्टींग घेण्यात आलेली नाही. त्यातील एखादा पार्ट बिघडल्यास ती यंत्रणा पुन्हा अमेरिकेत पाठवावी लागेल. त्यामुळे आठ ते दहा दिवसानंतर येथील यंत्रणा बसवण्याचे व टेस्टींगचे काम केले जाईल आणि लवकरच तारांगण नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल असेही सामंत यांनी सांगितले.