रत्नागिरी-आकाशवाणीच्या पार्किंग झोनमध्ये आग, तीन दुचाकी भस्मसात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-आकाशवाणीच्या पार्किंग झोनमध्ये आग, तीन दुचाकी भस्मसात
रत्नागिरी-आकाशवाणीच्या पार्किंग झोनमध्ये आग, तीन दुचाकी भस्मसात

रत्नागिरी-आकाशवाणीच्या पार्किंग झोनमध्ये आग, तीन दुचाकी भस्मसात

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat८p१७.jpg-KOP२२L५५२१०
रत्नागिरी ः रत्नागिरी आकाशवाणी केंद्राच्या पार्किग झोनमधील गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून वाहने भस्मसात झाली.

आकाशवाणी पार्किंग झोनमध्ये
आगीत तीन दुचाकी भस्मसात
रत्नागिरी, ता. ८ ः शहरातील थिबापॅलेस येथील आकाशवाणी केद्राच्या पार्किंग झोन मधील गॅरेजला शॉर्टसर्क्रीटमुळे लागलेल्या आगीत तीन दुचाकी भस्मसात झाल्या. ९० हजारांचे नुकसान झाले. शहर पोलिस ठाण्यात नुकसान प्रकरणी नोंद केली आहे. ही घटना शनिवारी (ता. ९) पहाटे साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी नंदादीप तुळशीदास बट्टा (वय ५९, रा. मनोज पाटणकर यांचे घर, थिबापॅलेस, रत्नागिरी ) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.
थिंबा पॅलेस परिसरातील आकाशवाणी केंद्राच्या पार्किग झोन येथे अचानक आगीचा तांडव पाहावयास मिळाला. गॅरेजमधील तीन दुचाकींनी शार्टसर्किटमुळे अचानक पेट घेतला. हे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये तीन दुचाकी भस्मसात झाल्या. यामध्ये तीन दुचाकी (एमएच-०८-एवाय- १२४२), (एमएच-१४ जीव्ही-५४४०) व (एमएच-०८-एव्ही-६०३२) भस्मसात झाल्या. शहर पोलिस ठाण्यात खबर मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. एकूण ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.