रिक्षा-मोटार अपघातात दोघे गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा-मोटार अपघातात
दोघे गंभीर जखमी
रिक्षा-मोटार अपघातात दोघे गंभीर जखमी

रिक्षा-मोटार अपघातात दोघे गंभीर जखमी

sakal_logo
By

55227
वेताळबांबर्डे ः अपघातग्रस्त रिक्षा.

रिक्षा-मोटार अपघातात
दोघे गंभीर जखमी
कुडाळ, ता. ८ ः मुंबई-गोवा महामार्गावर आज सायंकाळी चारच्या सुमारास वेताळ बांबर्डे पुलानजीक मोटार आणि रिक्षामध्ये अपघात झाला. यात दोघे गंभीर जखमी झाले. तर अन्य दोन महिला किरकोळ जखमी झाल्या.
अधिक माहिती अशी की, जानवली (ता. कणकवली) येथून दिनेश राणे हे रिक्षाने पिंगुळी येथे जात होते. रिक्षात चालक आणि तीन प्रवासी होते. त्यावेळी कणकवलीहून कुडाळकडे जाणाऱ्या मोटारीने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक राणे खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. रिक्षातील एक प्रवासी जखमी झाला असून त्यांच्या कंबर आणि डोक्याला मार लागला आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना ओरोस येथे उपचारासाठी दाखल केले.