सहज ट्रस्टतर्फे दोन पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहज ट्रस्टतर्फे दोन पुरस्कार
सहज ट्रस्टतर्फे दोन पुरस्कार

सहज ट्रस्टतर्फे दोन पुरस्कार

sakal_logo
By

55229
सावंतवाडी ः पत्रकार परिषदेत बोलताना मीनाक्षी.

सहज ट्रस्टतर्फे दोन पुरस्कार

मानसिक आजार निर्मूलनासाठी उपक्रम

सावंतवाडी, ता. ८ ः मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सहज ट्रस्टतर्फे दहा वर्षांपासून उपक्रम सुरू आहेत. यंदा सोमवारी (ता.१०) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ट्रस्टतर्फे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष मीनाक्षी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील पालिकेच्या पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेला ट्रस्टच्या संस्थापक सचिव स्वप्ना भिडे, सदस्य रश्मी भुसरी, गौरी अष्टेकर आदी उपस्थित होत्या. यावेळी मीनाक्षी म्हणाल्या, ‘‘मानसिक आजारातून सावरणाऱ्या व्यक्तीला आणि या व्यक्तीची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला असे दोन पुरस्कार सामाजिक आरोग्य पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहेत. मानसिक आजारातून बरे होण्यासाठी सहज ट्रस्ट समुपदेशन आणि जनजागृती करत आहे. हे पुरस्कार केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असून जिल्ह्यातील मानसिक आजार निर्मूलनासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून त्यांचे मानसिक असंतुलन, निराशा याबाबत ही संस्था अभ्यास करत आहे. अनुवंशिकतेचेही कारण असू शकते; मात्र हे कारण १५ ते २० टक्के इतके अल्प आहे. अपेक्षांचे ओझे, मानसिक दबाव, आर्थिक ताण-तणाव, बदलती जीवनशैली, नकारात्मक ऊर्जा ही मानसिक आजाराची प्रमुख कारणे असून यात १६ ते २० वयोगटांतील तरुणांचे अधिक प्रमाण असल्याचे दिसते. मानसिक आजारातून सावरणाऱ्या व्यक्तींसाठी ट्रस्टने उपक्रम सुरू केला आहे. औषधे, समुपदेशन यांच्या बरोबरीने ऱ्हास झालेली लहान-मोठी कौशल्ये आत्मसात करणे, हा सुधारणेच्या मार्गातला मोठा टप्पा आहे. ही कौशल्ये प्राप्त करत असतानाच ती उपयोगात आणणे आणि व्यक्तीला पुरेसा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. त्यातून अर्थार्जन सुरू राहून आत्मविश्वास वाढतो. याकरिता ट्रस्टने आजार समजून घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. औषध समुपदेशन आणि इतर तंत्र यांच्या भूमिका आणि महत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने ट्रस़्टचे प्रयत्न आहेत.’’