वेद गांवकर, वैभव मल्हार प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेद गांवकर, वैभव मल्हार प्रथम
वेद गांवकर, वैभव मल्हार प्रथम

वेद गांवकर, वैभव मल्हार प्रथम

sakal_logo
By

55231
तळेबाजार ः स्पर्धेतील विजेत्यांसोबत मान्यवर.

वेद गांवकर, वैभव मल्हार प्रथम

तळेबाजारची फॅन्सी ड्रेस स्पर्धा; ५३ स्पर्धकांचा सहभाग

देवगड, ता. ८ ः तळेबाजार (ता.देवगड) येथील नवतरुण उत्साही मंडळातर्फे आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील लहान गटात वेद गांवकर, तर मोठ्या गटात वैभव मल्हार याला प्रथम क्रमांक मिळाला. स्पर्धेत ५३ स्पर्धक सहभागी झाले.
गणेश उत्साही मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली. लहान गटात अनुक्रमे वेद गांवकर, दीपतेज धुरी, रियान म्हापसेकर व अवनिश म्हापसेकर, तर मोठ्या गटात अनुक्रमे वैभव मल्हार, ओम म्हापसेकर, विनायक धुरी पहिले तीन आले. लहान गट मुलींमध्ये अनुक्रमे पूर्वा जोईल, प्रांजल माणगावकर, श्रावणी लाड, तर मोठ्या गटात मुलींमध्ये ईश्वरी शंकरदास हिने प्रथम, प्रिया म्हापसेकर, क्रांती कातळकर, मानशी माणगावकर यांनी द्वितीय, तर श्रद्धा म्हापसेकर तृतीय आली. बेस्ट डान्सर म्हणून लहान गट मुलांमध्ये मयुरेश जोईल, मोठ्या गटात उदय पावसकर तर लहान गट मुलींमध्ये आराध्या पवार आणि मोठ्या गटात सायली शिवलकर यांना प्रथम क्रमांक मिळाला. परीक्षक म्हणून तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे नंदन घोगळे, शिक्षक बाळासाहेब कोकरे, शिक्षिका शोभा नाईक यांनी काम पाहिले. स्पर्धेवेळी माजी सरपंच संदीप तेली, तळेबाजार संस्थेचे खजिनदार संतोष वरेरकर, विश्वनाथ गिरकर, गणेश उत्साही मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सचिव संजय लक्ष्मण रूमडे, नवतरुण उत्साही मंडळाचे रोहीत म्हापसेकर, तिमिर माणगावकर, मंगेश मांजरेकर, प्रवीण पारकर, मिलिंद धुरी, रोहन म्हापसेकर, सुधीर म्हापसेकर, दत्तप्रसाद जोईल, प्रचित तावडे, संकेत कदम आदी उपस्थित होते. तर बक्षीस वितरण येथील पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले. सहभागी स्पर्धकांना चषक देण्यात आले.