सर्वोत्कृष्ट गायीका म्हणून भारती पाळेकरांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोत्कृष्ट गायीका म्हणून भारती पाळेकरांची निवड
सर्वोत्कृष्ट गायीका म्हणून भारती पाळेकरांची निवड

सर्वोत्कृष्ट गायीका म्हणून भारती पाळेकरांची निवड

sakal_logo
By

kan92.jpg
55258
कणकवलीः कामगार कल्याणच्या भजन स्पर्धेतील महीलांचा गौरव करण्यात आला.
--
सर्वोत्कृष्ट गायीका म्हणून
भारती पाळेकरांची निवड
कणकवली, ता. ९ः येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित भजन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गायीका म्हणून भारती पाळेकर ही निवड करण्यात आली. चिपळूण येथे ही स्पर्धा झाली.
महात्मा गांधी सप्ताहानिमित्त गटस्तरीय महिला व कामगार पुरूष भजन स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र कणकवली महिला भजन संघाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट गायीका भारती पाळेकर ही निवड करण्यात आली. कामगार पुरूष भजन स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र कणकवलीच्या विठ्ठला देवी दशावतारी नाट्य मंडळ राठीवडे यांना सर्वोत्कृष्ट भजन संघ म्हणून प्रथम क्रमांक मिळाला. तर सर्वोत्कृष्ट पखवाज आशिष मेस्त्री प्रथम, सर्वोत्कृष्ट गायक दयाळ मेस्त्री द्वितीय, सर्वोत्कृष्ट हार्मोनियम दयाळ मेस्त्री प्रथम, सर्वोत्कृष्ट तालसंचन प्रथम पारितोषिके मिळाली.
पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे पाहुणे कन्साई नेरोलॅक पेंट्सचे एच. आर. मॅनेजर संदेश पाटोळे यांच्या हस्ते झाले यावेळी जे. के. फाईल्स एच. आर. मॅनेजर राहुल पाटील, जे. के. फाईल्स प्लॅन्ट हेड प्रविण पाटील, वर्क मॅनेजर कन्साई नेरोलॅक पेंट्सचे संदीप दत्त आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण श्रीराम पवार, निकीता सावंत, यदुराव चौगले यांनी केले. स्वागत अरूण लाड तर सुत्रसंचालन संतोष नेवरेकर यांनी केले.