नाटळ मल्हारी पुलावरील रस्त्याची दुरावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटळ मल्हारी पुलावरील रस्त्याची दुरावस्था
नाटळ मल्हारी पुलावरील रस्त्याची दुरावस्था

नाटळ मल्हारी पुलावरील रस्त्याची दुरावस्था

sakal_logo
By

kan93.jpg
L55259
कनेडीः नाटळ मल्हारी पुलावरील रस्त्याची झालेली चाळण
-
नाटळ मल्हारी पुलावरील
रस्त्याची दुरावस्था
कनेडी, ता. ९ः येथून जवळच असलेल्या नाटळ मल्हारी फुलावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. गेल्या जूनमध्ये या पुलावरील वाहतुक सुरू झाली. त्यानंतर कोसळलेल्या पावसाने रस्तावर जागोजागी खड्डे पडले आहेत.
कनेडी बाजारपेठेतून नाटळ, नरवडे, दिगवळे, दारिस्ते या गावांना जोडणारा नाटळ मल्हारी नदीवरील पुल गेल्या वर्षी अतिवृष्टीत कोसळला होता. सुमारे ५७ वर्षे जुना दगडीपुल कोसळल्यानंतर तेथे पर्यायी मार्ग म्हणून लोंखडी पुल बांधण्यात आला. यंदा या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात आले. यासाठी राज्य शासनाने सहा कोटी रूपये निधी खर्च केला. मात्र, पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूच्या रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव खचल्याने तेथे जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याची तात्काळ डागडूजी करावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.