चिपळूण ः ठेकेदारांची बिले दिवाळीपूर्वी अदा करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः ठेकेदारांची बिले दिवाळीपूर्वी अदा करण्याची मागणी
चिपळूण ः ठेकेदारांची बिले दिवाळीपूर्वी अदा करण्याची मागणी

चिपळूण ः ठेकेदारांची बिले दिवाळीपूर्वी अदा करण्याची मागणी

sakal_logo
By

ठेकेदारांची बिले दिवाळीपूर्वी देण्याची मागणी
चिपळूण, ता. ९ ः महापुरात केलेल्या कामांची बिले अदा न केल्यास आम्हाला आत्मदहनासारखा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा चिपळुणातील ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
महापुरात रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूल व रस्ते वाहून गेले. ही कामे पावसाळ्यापूर्वी ठेकेदारांनी पूर्ण करून ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर केली; मात्र, ही कामे पूर्ण करूनदेखील आत्तापर्यंत केवळ १० ते १५ टक्के बिले अदा झाली आहेत. यामुळे ठेकेदारांसमोर आर्थिक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. गेल्या पाच महिन्यांपूर्वी आत्मदहनासारखे इशारे देऊनदेखील बिलांसंदर्भात कोणताही फरक पडलेला नाही. यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दिवाळीपूर्वी आमची उर्वरित बिले अदा करावीत, अशी मागणी केली आहे.
गेली २ वर्षे कोरोनासारख्या महाभयंकर साथीतून तसेच चिपळूण, खेड, गुहागर, मंडणगड, दापोली या ठिकाणी महापुराच्या तडाख्यामध्ये आम्ही आर्थिकदृष्ट्या कामे करूनही वर्षानुवर्षे आम्ही गेली अनेक वर्षे १०-१५ टक्के पेमेंट घेत आहोत. पेमेंट मिळत नाही म्हणून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही बिल अदा करण्यात कुठलाही फरक पडलेला नाही.
गेल्या जून २०२२ मध्ये ठेकेदारांनी आत्मदहनासारखे इशारे देऊनही बिलासंदर्भात फार मोठा फरक पडलेला नाही. ठेकेदार वर्ग आर्थिक बाबीतून देणेकऱ्यांच्या देण्यासाठी बँक, दुकानदार, व्यापाऱ्यांची देणी, लेबरचे देणे, मटेरियलचे देणे आदी देणी आम्ही वेळीच न दिल्यामुळे देणेकरी ठेकेदारांना सतत त्रास देत असतात. त्यामुळे ठेकेदार स्वतःहून आत्मदहन करण्याच्या विचारात आहेत, असे नमूद करताना येत्या दिवाळीपूर्वी शंभर टक्के बिले मिळावीत, अशी मागणी केली आहे.