रत्नागिरी- उद्योजक घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर पूर्ण पाठबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- उद्योजक घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर पूर्ण पाठबळ
रत्नागिरी- उद्योजक घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर पूर्ण पाठबळ

रत्नागिरी- उद्योजक घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर पूर्ण पाठबळ

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat9p4.jpg-KOP22L55309 रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी. सोबत पर्यटन समितीचे अध्यक्ष, आर्किटेक्ट संतोष तावडे, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर.
--------

उद्योजक घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबरला पूर्ण पाठबळ

उद्योगमंत्री उदय सामंत ; रत्नागिरीत जिल्हा कार्यालयाचे उदघाटन

रत्नागिरी, ता. 9 : महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, याकरिता राज्याचे उद्योगस्नेही धोरण बनवण्यात येईल. उद्योजक घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे काम मोठे आहेत. त्यांच्या बरोबरीने उद्योग खाते व शासन म्हणून आम्ही पूर्ण पाठबळ देऊ. महाराष्ट्र चेंबर कॉमर्सने दुर्बल घटकांना किंवा ज्याचे काहीच नाही, अशा लोकांना उद्योजक बनवले पाहिजे. त्यांना यशस्वी करण्यात हातभार लावला पाहिजे. उद्योजकांच्या अडचणी, समस्या चेंबरने आमच्याकडे मांडाव्यात, त्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे राहू, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅंड अॅग्रीकल्चर या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त अंबर हॉल येथे आयोजित कोकण उद्योग मंथन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष आशिष पेडणेकर, पर्यटन समिती अध्यक्ष, आर्किटेक्ट संतोष तावडे आदींसह जिल्ह्यातील मान्यवर उद्योजक व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्योगमंत्री झाल्यापासून गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या तीन कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. उद्योग येण्याकरता त्यांना फक्त इन्सेंटिव्ह देऊन नाही तर स्थानिक लोकांची सुद्धा मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. चेंबर्सनी उद्योजक बनवण्याची जबाबदारी आहे. असे कार्यक्रम करावेत, असे आवाहनही मंत्र्यांनी केले. महाराष्ट्रात आणण्याकरिता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, पाणी, ट्रीटमेंट प्लांट, इमारतींची डागडुजी करणे चांगल्या रितीने करायचे आहे. शिवाय महाराष्ट्रीयन माणसांना हे काम द्यायचे आहे. उद्योजकांच्या समस्या चेंबर्सने वकिली करून मांडाव्यात. बीच शॅक पॉलिसीत सुधारणा करून 10 वाजेपर्यंत मुदत दिली जाणार आहे. शासनाचे धोरणही उद्योजकांना चार पैसे मिळवून देणारे असले पाहिजे, असे मंत्री म्हणाले.
-------------
चौकट 1
छोट्या उद्योगांसाठीही रेड कार्पेट
राज्यकर्ते अडाणी, अंबानी अशा मोठ्या उद्योजगांसाठी रेड कार्पेट अंथरतो. परंतु 50 लाखाचा उद्योग करणाऱ्या छोट्या उद्योजकाला आम्ही रेड कार्पेटप्रमाणे सर्विस देण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता राज्याचे इन्सेंटिव्ह धोरण लवकरच मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत वर्षभरात जिल्ह्याला 550 कोटी रुपये प्राप्त झाले. बॅंकांनी उद्योजकांना कर्ज देण्यासाठी चांगले वातावरण तयार केल्यास तरुण उद्योजक निर्माण होतील. फ्लिपकार्टसोबत महिला बचत गटांच्या मार्केटिंगची जोड देण्यात येणार आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

.... बातमीदार- मकरंद पटवर्धन... 9.10.2022