मिलाग्रीस हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद
मिलाग्रीस हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद

sakal_logo
By

swt92.jpg
55317
सावंतवाडी ः क्रिडा स्पर्धेवेळी उपस्थित मान्यवरांसह विद्यार्थी.

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये
क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नेहरू हाऊस, विवेकानंद हाऊस, बोस हाऊस आणि टागोर हाऊस या शालेय परंपरेप्रमाणे असलेल्या विविध गटांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाळेचा ध्वज उभारून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी प्रतिनिधींनी मशाल घेऊन संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा घालत स्पर्धेची सुरुवात केली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सावंतवाडीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रशालाचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, उपमुख्याध्यापिका सि. मेबल करवालो, सिस्टर कसँड्रा, सिस्टर ट्रिझा, पर्यवेक्षिका मेघना राऊळ तसेच शालेय व्यवस्थापन समिती प्रतिनिधी शेख आदी उपस्थित होते. यानंतर विविध मैदानी स्पर्धांमध्ये कबड्डी, फुटबॉल, लंगडी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, डॉजबॉल व रिले या स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमधून विजयी व उपविजयी संघाला चषक त्याचप्रमाणे सहभागी व विजयी तसेच उपविजयी सर्व खेळाडूंना मेडल्स देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक खेळ प्रकारातून उत्कृष्ट खेळाडूची निवड करण्यात आली व त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धा १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील गटात घेण्यात आल्या. स्पर्धेचे आयोजन व नियोजन करण्यासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक राजेंद्र मोरे व शेरॉन अल्फांसो यांनी विशेष मेहनत घेतली. मुख्याध्यापक सालदाना यांनी आभार मानले.