पावस-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-संक्षिप्त पट्टा
पावस-संक्षिप्त पट्टा

पावस-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat9p6.jpg- पावस ः हजरत महंमद पीर दर्गा ते दखनी मोहल्ला येथे ईद- ए- मिलादुन नबीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली.
--------
पावसला ईदीनिमित्त मिरवणूक

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील हजरत शेख महंमद पीर दर्गा ते दखनी मोहल्ला येथे ईद- ए - मिलादुन नबी या मुस्लिम बांधवांच्या सणानिमित्त भव्य मिरवणूक काढून सर्वांच्या सहकार्याने जशणे ईद - ए- मिलादुन नबी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पावस येथील दखनी मोहल्ला अध्यक्ष वसीम म्हालादार यांच्या अध्यक्षतेखाली पावस दखनी मोहल्ला येथे ईद- ए- मिलादुन नबी या सणाचे नियोजन करण्यात आले होते. सर्वांनाच सुखी ठेवो अशी, प्रार्थना अध्यक्ष वसीम म्हालादार यांनी सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली. मिरवणूक शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव, मंडळाचे पदाधिकारी, पोलिसपाटील अशोक नैकर, होमगार्ड कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
-------------

फोटो ओळी
-rat9p7.jpg-KOP22L55301 पावस ः एक दिवस बळीराजासोबत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने.
----------

तोणदेत शेतकऱ्यांशी संवाद
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील तोणदे येथे एक दिवस बळीराजासोबत कार्यक्रमांतर्गत गावातील प्रगतशील शेतकरी कुंदन प्रभाकर सुर्वे यांच्या प्रक्षेत्राला विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने भेट दिली.
सरपंच सचिन भोवड, श्री. ठमके, श्री. नागवेकर, श्री. भोये, विनोद हेगडे, माधव बापट, श्री. कुंभार, श्री. शेंडगे आदींनी मार्गदर्शन केले. शेतकरी प्रकाश लिमये, संदीप भाटकर, सचिन सुर्वे, सतीश फळणीकर, योगेश तोडणकर, प्रकाश गुरव, राजेंद्र पेटकर, गोपीनाथ पावसकर, संदीप पावसकर, रामदास भाटकर आदी उपस्थित होते.