शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी अधिकारी नियुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी अधिकारी नियुक्त
शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी अधिकारी नियुक्त

शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी अधिकारी नियुक्त

sakal_logo
By

swt99.jpg
55351
सावंतवाडीः रत्नाकर धाकोरकर यांचे अभिनंदन करताना अनारोजीन लोबो. बाजूला अॅड. नीता सावंत-कविटकर, गजानन नाटेकर, बाबू कुडतरकर आदी.

शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी अधिकारी नियुक्त
मंत्री केसरकरांकडून दखलः सावंतवाडीतील कार्यालयात कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः शैक्षणिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कार्यालयात समन्वयक म्हणून निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांची नियुक्ती केली आहे. केसरकर यांच्यावर कोल्हापूर व मुंबई या दोन शहरांची पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील शिक्षण क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष देता यावे, यासाठी धाकोरकर यांची नियुक्ती केली आहे.
श्री. धाकोरकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी म्हणून कणकवली काम केले आहे. त्यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रशासनाच्या कारभाराबाबत चांगली माहिती आहे. काही वर्षांपूर्वीच ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर ते सामाजिक कार्यात सहभागी होते. धाकोरकर यांची नियुक्ती होताच त्यांचे सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्षा व शिंदे गटाच्या नेत्या अनारोजीन लोबो, अॅड. नीता कविटकर यांनी स्वागत केले.
यावेळी शिंदे गटाचे शहरप्रमुख बाबू कुडतरकर, गजानन नाटेकर, प्रकाश बिद्रे, महिला शहरप्रमुख भारती मोरे, ओटवणे सरपंच उत्कर्षा गावकर, विश्वास घाग, विशाल बांदेकर, उमेश गावकर आदी उपस्थित होते. केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट संपर्क कार्यालयात धाकोरकर सकाळी दहा वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर शालेय समस्या जाणून घेत त्या मंत्री केसरकर यांच्यामार्फत सोडवून घेणार आहेत. केसरकर यांच्या कार्यालयात शिक्षणविषयक निवारण केंद्र सुरू करण्यात आले असून तेथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.