राजापूर-दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविल्या बांबूच्या शोभेच्या वस्तू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविल्या बांबूच्या शोभेच्या वस्तू
राजापूर-दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविल्या बांबूच्या शोभेच्या वस्तू

राजापूर-दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविल्या बांबूच्या शोभेच्या वस्तू

sakal_logo
By

काही सुखद .................................लोगो

फोटो ओळी
-rat9p20.jpg 2L55359 -राजापूर ः कार्यशाळेमध्ये सहभागी होवून बांबूपासून विविध वस्तू बनविताना मुले आणि शिक्षकवृंद.
-rat9p21.jpg KOP22L55360 -राजापूर ः बांबूपासून तयार केलेल्या विविधांगी आकाशकंदीलासमवेत गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, मुख्याध्यापक लेंडवे आणि शिक्षकवृंद.
------------
दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविल्या बांबूच्या शोभेच्या वस्तू
आकाशकंदिल उजळले ; प्रसिद्ध बांबू कारागीर अरुण कांबळेंचे साह्य
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 9 ः समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद, समावेशित शिक्षण विभाग राजापूर अंतर्गत ओणी येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बांबूकाम कार्यशाळा झाली. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध बांबू कारागीर अरुण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांबूच्या सहाय्याने दिवाळीमध्ये सार्‍यांची घरे प्रकाशमान करणार्‍या आकर्षक आकाशकंदिलांसह अन्य वस्तू बनवून आपल्या हस्तकौशल्याची सार्‍यांना चुणूक दाखविली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डाएट प्राचार्य डॉ. गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना. कडू यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षम कौशल्य विकासित करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत आयोजकांचे कौतुक केले.ओणी प्रशालेचे मुख्याध्यापक लेंडवे यांनी बोलताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यशाळांचे असलेले नेमके महत्व सार्‍यांसमोर सविस्तरपणे मांडले. या कार्यशाळेमध्ये बांबू कारागीर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली समावेशित शिक्षण विभागातील विशेषतज्ञ, विशेष शिक्षक, प्रशालेचे कला शिक्षक यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृतीतून बांबूकामापासून विविध वस्तू करून घेतल्या. कांबळे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांमधील कलागुणांसह त्यांची क्षमता ओळखून त्यांना कोणत्या पद्धतीचे बांबूकाम करता येईल व ते कोणत्या पद्धतीने शिकविता येईल यासंबंधित मार्गदर्शन केले. त्याचवेळी विविध वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.

चौकट
कौशल्यालाही संधी
शेतीसह अन्य कामांसाठी लागणार्‍या विविध वस्तू बांबूपासून तयार करण्याचे कौशल्य असलेले अनेक कारागीर ग्रामीण भागामध्ये यापूर्वी पहायला मिळत होते. हे हस्तकौशल्य त्यांच्या रोजगाराचे साधन बनलेले होते. मात्र, कालपरत्वे बांबूच्या वस्तूंना मागणी कमी होवू लागली. त्यामुळे बांबूपासून वस्तू बनविणार्‍या कारागीरांची संख्या घटत आहे. अशा स्थितीमध्ये बांबूकाम कार्यशाळा आयोजनातून कौशल्य पुर्नजीवित होण्याला एकप्रकारे मदत मिळणार आहे.