रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat9p16.jpg- KOP22L55341
रत्नागिरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गामाता दौडच्या सांगतेवेळी रत्नदुर्ग किल्ल्यावर टिपलेले छायाचित्र.
---------
भगवती देवीच्या दर्शनाने
श्री दुर्गामाता दौडची सांगता
रत्नागिरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित घटस्थापनेपासून सुरू झालेल्या श्री दुर्गामाता दौडची विजयादशमीला रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीच्या दर्शनाने सांगता झाली. शिवप्रेमींनी हिंदुत्त्वाची शान असलेली पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. दौडमध्ये रत्नागिरी शहरासह आसपासच्या हातखंबा, निवळी, खेडशी, कारवांचीवाडी, टेंबेपूल, पाली, कसोप, फणसोप, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, शिरगाव, पावस आदी भागांतील शिवप्रेमी, राष्ट्रभक्त दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मारूती मंदिर, जयस्तंभ, मांडवी नाका, राम मंदिर किल्ला, भागेश्वर मंदिर, पेठ किल्ला श्री भगवती देवी मंदिर, रत्नदुर्ग किल्ला या मार्गे दुर्गामाता दौड घेण्यात आली. दौडीत रत्नागिरीतील विविध भागातून, गावातून सर्व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. ध्वजाचे नेतृत्व साहिल लाखण, किशोर शिंदे, कश्यप घोरपडे यांनी केले. राजेश आयरे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. देशाची भावी पिढी राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती, देशभक्ती, सत्व स्वाभिमान यांनी परिपूर्ण होण्यासाठी श्री दुर्गामाता दौडला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष राकेश नलावडे यांनी आभार मानले. पुढील अनेक उपक्रमात असेच उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नलावडे यांनी केले.

---------
गोठे तंटामुक्तच्या अध्यक्षपदी सुरेश पोस्टुरे
मंडणगड ः तालुक्यातील गोठे ग्रुपग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त ग्रामसमितीचे अध्यक्षपदी सुरेश पोस्टुरे यांची निवड करण्यात आली. सभेस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पोस्टुरे यांचे अभिनंदन केले.
------------

फोटो ओळी
-rat9p3.jpg ः KOP22L55308 चिपळूण ः शुभांगी शिंदे यांचा सत्कार करताना महिला पदाधिकारी.
----------
तिवरे तंटामुक्ती अध्यक्षपदी शुभांगी शिंदे
चिपळूण ः तिवरे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदी शुभांगी शिंदे यांची निवड करण्यात आली. सामाजिक, सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या या गावामध्ये महिलादेखील निर्णय घेण्यास सक्षम आहेत. हे या निवडीमधून पुन्हा एकदा सिद्ध झाले. अनेक सामाजिक उपक्रमात नेहमी आग्रेसर असणाऱ्या शिंदे यांची निवड झाल्याबद्दल प्रगती महिलामंडळ तिवरेच्या अध्यक्षा प्रज्ञा शिंदे , सुरेखा शिंदे, शोभा शिंदे, प्रमिला भोसले आदींनी सत्कार केला आहे.
----------

फोटो ओळी
-rat9p17.jpg-KOP22L55355 रत्नागिरी : बारटक्के इन्स्टिट्यूटतर्फे संगणक प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी पालक. पुढे बसलेले डावीकडून अतुल पालकर, मनोज पाटणकर, डॉ. कल्पना मेहता, आसक्ती भोळे, सीए वरदराज पंडित.
--------
बारटक्के इन्स्टिट्यूटतर्फे पालकांसाठी
संगणक प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता
रत्नागिरी : बदलत्या काळानुसार पालकांनी देखील स्वतःला संगणक विषयात अद्ययावत करावे, या हेतूने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्युटच्या वतीने रा. भा. शिर्के प्रशाला व आणि ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमधील पालकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. शालेय समिती अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता यांच्या संकल्पनेतून कार्यशाळा आयोजित केली होती. डॉ. मेहता, मनोज पाटणकर, सी. ए. वरदराज पंडित, मुख्याध्यापिका आसक्ती भोळे उपस्थित होते. तीन दिवसांच्या कार्यशाळेची सांगता प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रमाने झाली. कार्यशाळेसाठी बारटक्के इन्स्टिट्यूटचे समन्वयक डॉ. अतुल पित्रे व मुख्याध्यापिका भोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


फोटो ओळी
-rat9p8.jpg- KOP22L55302
रत्नागिरी ः आयडीयल हायस्कूल येथील खड्डे बुजवताना व्हॅन, स्कूल बस, रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष शब्बीर भाटकर व सहकारी.
----------
रिक्षा चालक संघटनेने बुजवले खड्डे
रत्नागिरी : शहरातील बोर्डिंग रोड (फणशी बागनजीक) येथील अजिजा दाऊद नाईक (आयडियल) हायस्कूलच्या मुख्य गेट समोरील रस्त्यावरील खड्डे व्हॅन, स्कूल बस, रिक्षा चालक संघटनेने बुजवले. या रस्त्यावर मोठमोठे एक ते दीड फूट खोल खड्डे पडलेले होते. ते खड्डे बुजविण्याकरिता नगरपालिका व प्रभागातील नगरसेवकांकडे सतत संपर्क करून मागणी करूनसुद्धा खड्डे भरले गेले नाहीत. त्या खड्ड्यामध्ये गटाराचे घाण पाणी साचून त्या पाण्यातून वाहने गेली असता तिथून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या कपड्यावर घाण पाणी उडत होते. त्यामुळे अजिजा दाऊद नाईक हायस्कूल येथे विद्यार्थी घेऊन येणारे व्हॅन, स्कूल बस व रिक्षा चालक, मालकांनी श्रमदान करून खड्डे बुजवले. या वेळी व्हॅन, स्कूल बस, रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष शब्बीर भाटकर, युसूफ मजगांवकर, मुख्तार सोलकर, वसीम म्हस्कर, अल्लिसाब मस्तान, इमाद, अरबाज मोगल, फरहान व इतर सभासद यांनी परिश्रम घेऊन खड्डे बुजविले.