खेड-ग्रंथालयासाठी लोकप्रतिनिधींना हवी आस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-ग्रंथालयासाठी लोकप्रतिनिधींना हवी आस्था
खेड-ग्रंथालयासाठी लोकप्रतिनिधींना हवी आस्था

खेड-ग्रंथालयासाठी लोकप्रतिनिधींना हवी आस्था

sakal_logo
By

ग्रंथालय चळवळ----लोगो

ग्रंथालयासाठी लोकप्रतिनिधींना हवी आस्था

आधुनिकतेची जोड ; सभासद टिकवण्यासाठी संघर्ष

खेड, ता. ९ ः मानवाची ज्ञान जिज्ञासा तृप्त करण्याचे पारंपारिक साधन पुस्तक आहे. पुस्तकांच्या माध्यमातूनच ती पूर्ण होवू शकते. त्यामुळे ग्रंथालयाना आधुनिकतेची जोड देत ज्ञानाचे भांडार सर्वसाधारण वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रंथालयांचे सक्षमीकरणे करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी शासनाच्या यंत्रणेसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींची याबाबतची आस्था कितपत आहे हे पडताळून पाहणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींची साथ मिळाल्यास ग्रंथालयांना आधुनिकतेकडे नेणे सोपे होईल.
ग्रंथालयाच्या सभासद संख्येमध्ये घट होवू लागली असून ग्रंथालये सभासद टिकवण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. मात्र ज्ञानलालसा पुस्तके हाताळण्यातूनच समाधान मिळवून देवू शकते. त्यामुळे ग्रंथालय चळवळीला आधुनिक रुप देण्याची नितांत गरज आहे. ग्रंथालय हाताळण्याची प्रक्रिया ग्रंथालयांचे संचालन व ग्रंथालयातील पुस्तक देवाण घेवाणीचे व्यवहार ग्रंथाच्या नोंदी व अन्य प्रक्रीयेतील बाबी आधुनिकतेच्या जोडीने गतीमान व समृद्ध करता येऊ शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुस्तके वाचण्यास इच्छुक असलेले व ग्रंथ सांभाळणारी ग्रंथालये यांच्यामधील संवाद गतिमान करता येऊ शकतो. नगर अथवा ग्रामीण वाचनालयामध्ये उपलब्ध असलेल्या ग्रंथांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विशिष्ठ अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून पोहचविण्याची सुविधा उपलब्ध होवू शकते. त्यामुळे ग्रंथालयाकडे वाचकांची पावले वळू शकतात. परंतु ते करण्यासाठी शासनाने आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. ग्रंथालय चळवळीला राजाश्रय लाभला असला तरी आधुनिकतेची जोड न मिळाल्याने ग्रंथालय एक समुद्ध अडगळ म्हणूनच सांभाळावी लागत आहे. हे चित्र बदलायचे झाल्यास आधुनिकेतेची जोड देऊन स्मार्ट ग्रंथालय, वाचकाच्या पंसतीस पडेल असे ग्रंथालय , नवीन पिढीला आकर्षित करेल असे ग्रंथालय प्रत्येक वस्तीत उभारण्यासाठी व ती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.
---
चौकट
राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न
ग्रामीण भागासह शहर परिसरातील ग्रंथालयांना खर्‍या अर्थांने राजाश्रय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. माझ्या विधानसभा मतदारसंघातील ग्रंथालयांना उभारी देण्यासाठी येत्या काही दिवसातच वाचाल तर वाचाल असे विविध उपक्रम माझ्या मतदार संघात घेणार आहे. पावसाळी अधिवेशनात ग्रंथालयाना मिळणारे तुटपूंजे अनुदान व मान्यता याबाबत वाढीव अनुदान व प्रतिक्षेत असलेल्या ग्रंथालयांना मान्यता मिळावी अशी घोषणा झाली होती. परंतु अद्यापही अमंलबजावणी झालेली नाही. त्यामुळे येणार्‍या हिवाळी अधिवेशनात याकडे शासनाचे लक्ष वेधेन अशी प्रतिक्रिया आसदार योगेश कदम यांनी दिली.