डॉक्टरांमुळे जीवनाला बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टरांमुळे जीवनाला बळ
डॉक्टरांमुळे जीवनाला बळ

डॉक्टरांमुळे जीवनाला बळ

sakal_logo
By

swt918.jpg
L55431
सावंतवाडीः येथील संस्थान व अटल प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू. शेजारी युवराज लखमराजे भोसले, श्रध्दाराजे भोसले, अॅड. नकुल पार्सेकर, शरद चव्हाण, डॉ. अमेय देसाई व अन्य. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

डॉक्टरांमुळे जीवनाला बळ
सुरेश प्रभूः सावंतवाडीत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः डॉक्टर आधुनिक काळातील देवदूत आहेत. त्यांच्यामुळे आपल्या जगण्याला बळ मिळते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे व्यक्त केले.
सावंतवाडी संस्थानशी पूर्वीपासून स्नेहसंबंध होते. परंतु, त्यांच्याकडे कधी मते मागायला आलो नाही. लोकांशी मतदान पुरता संबंध ठेवला कि माणुसकी संपते, असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान यांच्यावतीने उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली या अद्यावत हॉस्पीटलच्या सहकार्याने महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री प्रभू यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी आयोजक युवराज लखमराजे भोसले, श्रध्दाराजे भोसले, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, डॉ. अमेय देसाई, उषःकालचे संजय खोग्रेकर, भाजपाचे शरद चव्हाण, डॉ. राजेश नवागुंळ, भाजपचे राष्ट्रीय सदस्य पुखराज राजपुरोहित, डॉ. राजशेखर कार्लेकर आदी उपस्थित होते.
प्रभू म्हणाले, ‘‘महाआरोग्य शिबिर डॉ. देसाई यांच्या पुढाकाराने युवराज भोसले व अॅड. पार्सेकर यांनी घेतले. पार्सेकर हे झपाटून काम करतात. सावंतवाडी राजघराण्याची शेकडो वर्षाची लोकसेवेची परंपरा आहे. समाजसेवा करण्याची परंपरा जनतेच्या दृष्टीने चांगली असून सावंतवाडी संस्थान व अटल प्रतिष्ठानने महाआरोग्य शिबीर आयोजित केले. जगभरात अदृश्य विषाणू व्हायरल झाल्याने हाहाकार उडाला. कोविड येईल आणि जीवनावर त्याचा प्रभाव पडेल असे कोणालाही वाटले नव्हते. यामुळे आरोग्य व जीवनाची काळजी घेण्याची प्रेरणा जनतेला मिळाली.’’
लखमराजे भोसले म्हणाले, ‘‘महाआरोग्य शिबिर आयोजित केल्याने लोकांना रुग्णसेवा मिळेल. लोकांच्या जीवन आणि मानसिक आजारावर देखील शिबिर उपयोगी ठरेल. सावंतवाडी राजघराणे कायम प्रजेचे हित, आरोग्य पाहिले तेच आम्ही पुढे नेत आहोत. राजकारणात उतरलो तो लोकांच्या सेवेसाठीच. पूर्वजांच्या पुण्याईने मला जनता मानसन्मान देते. त्यांची सेवा करणे हे माझे मी कर्तव्य मानतो." अॅड. पार्सेकर म्हणाले, "या महाआरोग्य शिबिराचे आयोजन प्रभू यांच्या प्रेरणेतून केले. ते सतत आपल्या लोकांबद्दल आदर ठेवून काम करत असतात.’’
या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना धन्यवाद दिले. यावेळी उषःकालचे संजय खोग्रेकर यांनी रूग्ण सेवेबाबत संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल धन्यवाद दिले. या शिबिराला सुमारे १५० पेक्षा जास्त शिबिरार्थी यांनी सहभाग घेतला. यावेळी चित्रकार एस. बी पोलाजी, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, डी. के. सावंत, डॉ. सुरेश सावंत, मोहन होडावडेकर, डॉ. जी. ए .बुवा, डॉ. दिलीप भारमल, डि. टी. देसाई, डॉ. गणेश मर्गज, गोविंद प्रभू उपस्थित होते.