पिंगुळी मठात भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळी मठात भाविकांची गर्दी
पिंगुळी मठात भाविकांची गर्दी

पिंगुळी मठात भाविकांची गर्दी

sakal_logo
By

swt९१९.jpg
५५४१३
पिंगुळीः परमपूरज्य महाराजांचा जन्मोत्सव व सुहासिनींच्या हस्ते पाळणा झोका कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. (छायाचित्रः अजय सावंत)

पिंगुळीत राऊळ महाराज जयंती उत्सव
मठात दर्शनासाठी भाविकांची गर्दी; परिसरात चैतन्यमय वातावरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ः श्री सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ११८ वा जयंती उत्सव पिंगुळी येथील महाराजांच्या समाधी मंदिरात आज मोठ्या भक्तीमय वातावरणात झाला. यानिमित्ताने मठात असंख्य भाविकांची गर्दी लोटली.
राऊळ महाराज जयंती उत्सव व कोजागरी पौर्णिमेनिमित्त पहाटे काकड आरती, सकाळी श्री राऊळ महाराज समाधीस्थानी अभिषेक, सार्वजनिक अभिषेक, गाऱ्हाणे, श्री विनायक अण्णा महाराज समाधीस्थानी अभिषेक, हरिपाठ, भजन, यानंतर नामस्मरण, दुपारी महाराजांची आरती यानंतर झालेल्या अखंड महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. दुपारी १ नंतर दत्त संगीत भजनी मंडळ कोल्हापूर यांचा कार्यक्रम, त्यानंतर महाराजांचा जन्मोत्सव व सुहासिनींच्या हस्ते पाळणा झोका कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी हजारो भाविकांची गर्दी लोटली होती. यावेळी मठातील वातावरण भक्तीमय झाले होते. यानंतर जीवनविद्या मिशन कुडाळ प्रस्तुत उपासना यज्ञ हरिपाठ, सायंकाळी गायन, श्री राऊळ महाराज महिला मंडळाचे भजन, सायंकाळी नित्य सांजआरती, रात्री दिंडी मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली. रात्री १० वाजता भगवती प्रासादिक भजन मंडळ, बांव यांचे भजन (बुवा-लक्ष्मण नेवाळकर, पखवाज-विराज बावकर) असे कार्यक्रम कार्यक्रम मठात साजरे करण्यात आले. दिवसभरात हजारो भाविकांनी राऊळ महाराज व अण्णा राऊळ महाराज समाधी स्थानाचे भावपूर्ण दर्शन घेतले. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मठातील वातावरण चैतन्यमय झाले होते.