रत्नागिरी-ड्रोनद्वारे सात मिनिटात एक एकरवर फवारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-ड्रोनद्वारे सात मिनिटात एक एकरवर फवारणी
रत्नागिरी-ड्रोनद्वारे सात मिनिटात एक एकरवर फवारणी

रत्नागिरी-ड्रोनद्वारे सात मिनिटात एक एकरवर फवारणी

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat९p१८.jpg- KOP२२L५५३५८ रत्नागिरी ः मालगुंड येथे ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली
- rat९p१९.jpg-KOP२२L५५३५४ रत्नागिरी ः ड्रोनची माहिती देताना अधिकारी.
-----------------

ड्रोनद्वारे सात मिनिटात एक एकरवर फवारणी
आंबा, काजू बागातयदारांना फायदा; मजुरीच्या खर्चात कपात
रत्नागिरी, ता. ९ ः डोंगराळ भागात पसरलेल्या आंबा, काजूच्या बागांमधील औषध फवारणीसाठी दरवर्षी बागायतदारांना मोठा खर्च करावा लागतो. तो खर्च वाचवण्यासाठी आता ड्रोणद्वारे फवारणी करणे सोयीस्कर ठरणार आहे. सात मिनिटात एक एकर बागायत क्षेत्रावर फवारणी केली जाते. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे झालेल्या दहा प्रात्यक्षिकांमधून ड्रोणद्वारे फवारणी फायदेशीर असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. बागायतदारांचा मोठा खर्च वाचणार आहे.


कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती, गरूडा एरोस्पेस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दहा बागायतींमध्ये ड्रोनचा वापर करुन औषध फवारणीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील पाचशेहून अधिक बागायतदारांनी सहभाग घेतला होता. गेल्या काही वर्षात भल्या मोठ्या आंबा कलमांची जागा आता कमी उंचीच्या रोपांनी घेतली आहे. पुरुज्जीवनावर भर दिला जात आहे. आंबा काढणीसाठी येणारा खर्च, हवामानामुळे उत्पादनातही सातत्य नसल्याने बागायतदार अडचणीत येतो. यासाठी आंबा व्यावसायिकांपुढे खर्च कपातीचे मोठे आव्हान असते. हवामानातील बदलांमुळे बागायतदारांना वारंवार औषध फवारणी करावी लागते. दहा वर्षांपूर्वी चार फवारण्या होत होत्या, आता त्यात दुप्पट वाढ झाली आहे. क्षेत्रानुसार फवारणीचा खर्च होत असतो. मजुरीचे दर वाढले असून दिवसाला एक मजूर तिनशे ते चारशे रुपये घेतात. आंबा हंगाम तीन महिन्याचा असून औषध फवारणीसाठीचा खर्च दिवसेंदिवस बागायतदारांना परवडत नाही. शेती नांगरणी, गवत काढणी यासाठी आता तंत्राचा वापर केला जातो. औषध फवारणीसाठीही ड्रोनचा वापर शेतकर्‍यांनाही फायदेशीर ठरू शकते. एका एकरमध्ये सरासरी शंभर झाडे असतात. त्यावर ड्रोनद्वारे फवारणी केल्यास सात मिनिटे लागतात. दहा लिटर औषध साठवून ठेवण्याची क्षमता ड्रोनमध्ये आहे. ड्रोन एकदा हवेत सोडल्यास तो जास्तीत जास्त पंधरा मिनिटे ठेवता येतो. तशी रचना केलेली असते. ड्रोनसाठी सुमारे साडेआठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यावर कृषी विभागाकडून अनुदान दिले जाते.

चौकट
पायलट प्रशिक्षणाचा प्रश्न
ड्रोन उडवण्यासाठी (पायलट) प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. नगर येथील राहूरी कृषी विद्यापिठामध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु केला आहे; मात्र त्यासाठी बारावी पास आणि उत्तम इंग्रजी येणे अशा दोन अटी ठेवण्यात आल्या आहेत. कोकणातील सामान्य शेतकऱ्‍यांच्या कुटूंबात इंग्रजीचे ज्ञान असणारे कमी शेतकरी आहेत. या अटीमुळे याचा फायदा मिळणार नाही

कोट
कोकणातील आंबा, काजू बागायतदारांसाठी ड्रोनद्वारे औषध फवारणी करणे फायदेशीर आहे. आर्थिक बचत होऊ शकते. याचा लाभ घेण्यासाठी बागायतदारांनी पुढे आले पाहिजे.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी