रत्नागिरी-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम
रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

sakal_logo
By

साठरेबांबर येथे जुगार अड्यावर छापा
रत्नागिरी ः तालुक्यातील साठरेबांबर फाटा ते पाली जाणाऱ्या रस्त्याच्या उघड्या पिकअपशेडमध्ये विनापरवाना कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. यात साहित्यासह 945 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुनिल नायकू सावंत (वय 45, रा. बौद्धवाडी-पाली, रत्नागिरी) या संशयितावर गुन्हा नोंद केला. ही घटना शनिवारी (ता. 8) दीडच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साठरेबांबर फाटा ते पाली येथील रस्त्यावरील उघड्या पिकअपशेड येथे कारवाई केली. या कारवाईत संशयित सावंत यांच्याकडे जुगाराच्या साहित्यासह 945 रुपये सापडले. या प्रकरणी पोलिस हवालदार संतोष कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस फौजदार कांबळे करत आहेत.