वामन काळे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वामन काळे यांचे निधन
वामन काळे यांचे निधन

वामन काळे यांचे निधन

sakal_logo
By

सांगलीसह अन्य आवृत्यांसाठी

फोटो नं. बातमीच्या शेवटी

आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक
वामन काळे यांचे निधन

सांगली, ता. ९ ः आकाशवाणी सांगली केंद्राचे निवृत्त ज्येष्ठ निवेदक वामन रामकृष्ण काळे (वय ७७) यांचे आज एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगलीचा सांस्कृतिक आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. १०) दुपारी चारला अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जिल्ह्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील जडणघडणींशी आकाशवाणीच्या माध्यमातून काळे यांचा निकटचा संबंध राहिला. साहित्य, नाट्य, संगीत या क्षेत्रांतील विविध उपक्रम व चळवळींशी ते लेखक व कलाकार म्हणून जोडले गेले. उत्कृष्ट कथाकार, कवी व मुलाखतकार म्हणून ते महाराष्ट्रात ख्यातकीर्त होते. काळे यांची ‘ज्याचे-त्याचे आकाश’, ‘उत्तर नाही’, ‘स्वगत’, ‘रक्त आणि अत्तर’, ‘संध्याछाया’, ‘कातळावर’, ‘प्रेमरत्न’, ‘अज्ञ’, ‘द वूड्स ऑफ सायलेन्सर’, ‘आकाशातील आकाशर्, ‘अमीबाची डायरी’ अशी ग्रंथसंपदा आहे.
काळे यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वाडा. आकाशवाणीतील नोकरीनिमित्त ते १९६८ मध्ये सांगलीत आले. ३८ वर्षांच्या सेवेनंतर २००५ मध्ये ते निवृत्त झाले होते.
मृदु, संयत, भारदस्त आवाज, त्याचबरोबर आकाशवाणीच्या माध्यमातून सादर केलेल्या कार्यक्रमांमुळे ते दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात उत्तम निवेदक म्हणून सुपरिचित होते. साहित्यिक दिवंगत श्रीपाद काळे यांचे ते कनिष्ठ बंधू होत. सांगली जिल्हा नगर वाचनालय, संगीत साधना, जनस्वास्थ्य, ॲमॅच्युअर ड्रामॅटिक असोसिएशन, चतुरंग, अन्वय, रंगवेध सांस्कृतिक व्यासपीठ अशा सांस्कृतिक संस्थांशी व उपक्रमांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
फोटो ः SGI22B27291