संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

आंतरशालेय फूटबॉल सराव सामने
दाभोळ ः दापोली फूटबॉल असोसिएशनने आंतरशालेय फूटबॉल सराव सामन्यांचे आयोजन दापोलीच्या आझाद मैदानावर करण्यात आले होते. डेरवण क्रीडासंकूल येथील 14 वर्षांखालील वयोगटातील मुली, डेरवण क्रीडासंकूल येथील 17 वर्षे खालील वयोगटातील मुलेसुद्धा सहभागी झाली होती. दापोली येथील ए. जी. हायस्कूल, यु. ए. दळवी इंग्लिश स्कूल, सरस्वती इंग्लिश स्कूल, संतोषभाई मेहता इंग्लिश स्कूल, सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल या शाळांचे 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील मुलेही सहभागी झाली होती. पहिल्यांदाच मुलींच्या फूटबॉल खेळाचे उत्तम प्रदर्शन दापोलीकारांना पाहावयास मिळाले. प्रसाद परांजपे, विनोद म्हस्के, मिलिंद खानविलकर, राजगोपाल मयेकर, ऋषिकेश मढव आदी उपस्थित होते.

rat11p37.jpg ःKOP22L55763 राजापूर ः कोंड्ये येथील भाजप कार्यकर्त्यांसमवेत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण.

कोंड्येच्या विकासासाठी मंत्र्याना निवेदन
राजापूर ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची तालुक्यातील कोंड्ये येथील भाजपा कार्यकर्त्यांनी नुकतीच भेट घेतली. या वेळी कोंड्ये गावातील विकासाकामांबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने कोंड्ये येथील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


rat11p38.jpg ः KOP22L55769 राजापूर ः प्रवेशकर्त्या आजिवली येथील तरुणांसमवेत मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, सहकार सेना जिल्हा संघटक पुरुषोत्तम खांबल, अशोक मोरे, अमोल सोगम, विनायक वाडेकर आदी.

तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश
राजापूर ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तालुक्यातील आजिवली येथील मोठ्या संख्येने तरुणांनी मनसेमध्ये नुकताच प्रवेश केला. मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अविनाश सौंदळकर, तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव यांनी त्यांचे मनसेमध्ये स्वागत केले. या वेळी मनसेचे सहकार सेना जिल्हा संघटक पुरुषोत्तम खांबल, रोजगार स्वयंरोजगार तालुका संघटक अशोक मोरे, विभाग अध्यक्ष अमोल सोगम, शाखाध्यक्ष विनायक वाडेकर उपस्थित होते.