‘सिंधू रक्तमित्रां’चा वेंगुर्लेत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सिंधू रक्तमित्रां’चा वेंगुर्लेत सत्कार
‘सिंधू रक्तमित्रां’चा वेंगुर्लेत सत्कार

‘सिंधू रक्तमित्रां’चा वेंगुर्लेत सत्कार

sakal_logo
By

56019
वेंगुर्ले ः येथे आयोजित कार्यक्रमात सिंधु रक्तमित्रांचा सत्कार केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू.


‘सिंधू रक्तमित्रां’चा वेंगुर्लेत सत्कार

३६ जणांचा समावेश; माजी केंद्रीय मंत्री प्रभूंची कौतुकाची थाप

बांदा, ता. १२ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना कालावधीत तसेच आतापर्यंत रक्तदान चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या ३६ कार्यकर्त्यांचा सन्मान वेंगुर्ले येथे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.
‘अटल प्रतिष्ठान’, ‘किरात ट्रस्ट’ व ‘माझा वेंगुर्ला’ या संस्थांतर्फे वेंगुर्ले येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कोविड काळात वैद्यकीय सेवा बजावलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.
‘सिंधू रक्तमित्र’ प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, कार्यवाह किशोर नाचणोलकर यांच्यासह येथील अॅलिस्टर ब्रिटो, महेश राऊळ, सनी रेडकर, रुपाली परब, प्रसाद नाईक, ओरोस येथील साईनाथ आंबेरकर, डॉ. वैभव आईर, निकिता नाईक, कुडाळ येथील कल्पिता साटेलकर, यशवंत गावडे, प्रसाद वारंग, मकरंद नाईक, मंगेश प्रभू, सावंतवाडी येथील बाबली गवंडे, सिद्धार्थ पराडकर, महेश रेमुळकर, एकनाथ चव्हाण, बांदा येथील पत्रकार नीलेश मोरजकर, अक्षय मयेकर, सुनील गावडे, दोडामार्ग येथील भूषण सावंत, विवेकानंद नाईक, गीतांजली सातार्डेकर, संजय पिळणकर, मालवण येथील दत्ता पिंगुळकर, शिल्पा खोत, प्रा. सुमेधा नाईक, देवगड येथील विजयकुमार जोशी, प्रकाश जाधव, महेश शिरोडकर, उद्धव गोरे, कणकवली येथील अमेय मडव, तन्वी भट, अभिषेक नाडकर्णी, वैभववाडी येथील राजेश पडवळ या रक्तमित्रांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, उमा प्रभू, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माझा वेंगुर्ला संस्थेचे अध्यक्ष नीलेश चेंदवणकर, नकुल पार्सेकर, शशांक मराठे, सीमा मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रभू यांनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. तसेच कमी वेळेत रुग्णापर्यंत केवळ सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई येथे तत्काळ रक्त उपलब्ध करून देण्याच्या कार्याबाबत विशेष गोरवोद्गार काढले.