सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाला हृदयरोगतज्ज्ञ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीच्या उपजिल्हा
रुग्णालयाला हृदयरोगतज्ज्ञ
सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाला हृदयरोगतज्ज्ञ

सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाला हृदयरोगतज्ज्ञ

sakal_logo
By

55980
सावंतवाडी : डॉक्टर निर्मला सावंत यांचा सत्कार करताना राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी.

सावंतवाडीच्या उपजिल्हा
रुग्णालयाला हृदयरोगतज्ज्ञ

डॉ. सावंत रुजू; मित्रमंडळातर्फे स्वागत

सावंतवाडी, ता. १५ ः येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निर्मला सावंत नुकत्याच रुजू झाल्या असून त्यांचा राजा शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी बालरोग तज्ज्ञ संदीप सावंत यांचाही सत्कार केला.
डॉ. निर्मला सावंत मूळच्या सावंतवाडीच्या रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण मुंबई येथील जे. जे. शासकीय रुग्णालयात झाले. जे. जे. रुग्णालयात त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ ही पदवी प्राप्त करून तेथेच काही वर्षे अनुभव घेतला. कोल्हापूर-इचलकरंजी येथे खासगी रुग्णालयात काही वर्षे सेवा बजावली. पाच वर्षांपूर्वी त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवा बजावली होती. त्यानंतर काही घरगुती अडचणींमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. सद्यस्थितीत रुग्णांच्या तपासणीसाठी त्यांचे खासगी क्लिनिक मच्छीमार्केट जगन्नाथराव भोसले शाळा नंबर तीनच्या समोर आहे. तरीही त्या उपजिल्हा रुग्णालयात ऑन कॉल हृदयरोगतज्ज्ञ म्हणून सेवा बजावणार आहेत. यामध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी प्रकारच्या गंभीर आजारांचे रुग्ण तपासणार आहेत. शासकीय रुग्णालयात त्यांच्या तपासणीची वेळ सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड राहील. दरम्यान, याप्रसंगी डॉ. वज्राटकर, डॉ. संदीप सावंत, सागर जाधव, डॉ. लादे सिस्टर, वॉर्ड बॉय तसेच शिवाजी चौक त्रमंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष विजय पवार, बंड्या तोरस्कर, सचिव दीपक सावंत, महादेव राऊत, रत्नाकर माळी, प्रदीप नाईक, संजय साळगावकर, उमेश खटावकर, वासुदेव खानोलकर, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, शुभम मळकाचे, ‘सामाजिक बांधिलकी’चे संजय पेडणेकर, रवी जाधव आदी उपस्थित होते.