महाबँकेची जिल्ह्यात उत्तुंग भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाबँकेची जिल्ह्यात उत्तुंग भरारी
महाबँकेची जिल्ह्यात उत्तुंग भरारी

महाबँकेची जिल्ह्यात उत्तुंग भरारी

sakal_logo
By

55976
ओरोस ः महाबँकेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२ व्या शाखेचे उद्‍घाटन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर. शेजारी इतर.


महाबँकेची जिल्ह्यात उत्तुंग भरारी

सीईओ प्रजित नायर; सिंधुदुर्गनगरीत २२ व्या शाखेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः बँक ऑफ महाराष्ट्रचा अधिकारी व कर्मचारी वर्ग ग्राहकांना सेवाभावीवृत्तीने सेवा देण्याचे अतिशय चांगले काम करीत आहे. जिल्ह्यातही महाबँकेने आपल्या कार्याने उत्तुंग भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज सिंधुदुर्गनगरी येथे महाबँकेच्या जिल्ह्यातील २२ व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी केले
‘एक बँक एक कुटुंब’ या ब्रीदानुसार कार्यरत असणाऱ्या महाबँकेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२ व्या शाखेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, बँक महाप्रबंधक विजय कांबळे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक मुकेश मेश्राम, महाबँकेचे पणजी झोनल मॅनेजर आनंद शंकर, डेप्युटी मॅनेजर आनंद डिंगणकर, ओरोस शाखाधिकारी चंद्रकांत, बँक ऑफ इंडियाचे फनीकुमार, माजी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, उद्योजक संतोष वालावलकर, स्मिता ठाकूर, उज्ज्वला धानजी, कुडाळ शाखाधिकारी ब्रजेशकुमार, सुभाष सुर्वे, कट्टा शाखाधिकारी मीलन कापडिया, खारेपाटण शाखाधिकारी मनीष कुमार, कणकवली शाखाधिकारी आर. श्रीकृष्णा गौड, मालवण शाखाधिकारी मंदार पाटील, कडावल शाखाधिकारी कृष्णा दिलेवार, श्री. करंदीकर, विल्सन डिसोझा, राजन राऊळ आदी उपस्थित होते.
नायर यांनी, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात बँकांचे फार मोठे योगदान आहे. येथील बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांना सेवा देतानाच सामाजिक, शासकीय उपक्रमांतही उल्लेखनीय कार्य केले आहे. भविष्यातही ग्राहक सेवेची वाटचाल ही सुरू राहावी, असे सांगून नवीन शाखेस शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आनंद शंकर सर्वांच्या सहकार्यामुळे सिंधुदुर्गनगरीत जिल्ह्यातील २२ वी शाखा सुरू होत असून या सेवेच्या माध्यमातून आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले. डिंगणकर यांनी येथील व्यावसायिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाबँक सदैव कटिबद्ध राहील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला धानजी यांनी केले.
--
इतर मान्यवरांचेही मार्गदर्शन
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांनी सर्व ग्राहक, कर्जदारांना चांगली सेवा देण्याचे काम महाबँक करीत आहे. बँकेने दिलेल्या कर्जाच्या माध्यमातून अनेकांनी उद्योगांसह अन्य व्यवसायांत प्रगती केली आहे. प्रत्येकाने बचत करून बँकेच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कांबळे यांनी ग्राहक, कर्जदार हे बँकेचे दैवत असल्याचे सांगून उद्योग-व्यवसायाबाबत कर्ज देण्यासाठी बँक नेहमीच कार्यरत राहील, अशे आश्वासित केले. कर्ज घेतल्यानंतर प्रामाणिकपणे परतफेड करावी. परतफेड झाल्यानंतर पुन्हा नवीन व्यवसायासाठी कर्ज घेऊन बँकेचा विश्वास संपादन करा, असे आवाहन त्यांनी केले.