ओरोस हायस्कूलने विद्यार्थी घडविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओरोस हायस्कूलने विद्यार्थी घडविले
ओरोस हायस्कूलने विद्यार्थी घडविले

ओरोस हायस्कूलने विद्यार्थी घडविले

sakal_logo
By

55977
सिंधुदुर्गनगरी : यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्ष आनंद सावंत, प्रभाकर सावंत, यशवंत परब आदी.

ओरोस हायस्कूलने विद्यार्थी घडविले

आनंद सावंत ः गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ओरोस, ता. १२ ः ओरोस हायस्कूलने निर्मिती काळापासून अनेक खेळाडू जिल्ह्याला आणि विभागाला दिले. नवीन वास्तूत शाळा सुरू झाल्यावर हीच परंपरा शाळेने सुरू ठेवली असून या संस्थेचा अध्यक्ष असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन कसाल शिक्षण संस्थाध्यक्ष आनंद सावंत यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खो-खो निवड चाचणीमध्ये (मुले/मुली) सौरभ स्पोर्ट्स हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सौरभ स्पोर्ट्समधून सिंधुदुर्ग संघात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ओरोस (सिंधुदुर्गनगरी) हायस्कूलच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. यात मुलांमधून सम्यक पेंडूरकर, आदित्य राठोड व मुलींमधून सानिका खंडवी यांचा समावेश आहे. तसेच जिल्हास्तरीय सुगम संगीत गायन स्पर्धेत पाचवी ते आठवी या गटात ध्रुव गोसावीने द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांचा व प्रशिक्षकांचा धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष सावंत, सचिव यशवंत परब, शालेय समिती अध्यक्ष प्रभाकर सावंत, विश्वस्त अवधूत मालवलणकर, कसाल हायस्कूलचे मुख्याध्यापक गुरुनाथ कुसगावकर, श्री. रायबान उपस्थित होते. तसेच प्रशिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक अनंत साईल, प्रशिक्षक सिद्धेश डोंगरे, गोसावी, क्रीडा शिक्षक एस. एस. सावंत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अध्यक्ष सावंत यांनी ओरोस (सिंधुदुर्गनगरी) हायस्कूल हे जिल्हा परिषदेच्या भाड्याच्या इमारतीत कार्यरत होते. तत्कालीन अपूर्ण सोयी सुविधांवर मात करत शिक्षकांनी क्रीडा, संगीत, नाट्य अशा अनेक कलांमध्ये प्राविण्य मिळविले. क्रीडा क्षेत्रात चमकलेले पंचविसहुन अधिक विद्यार्थी आज पोलिस आणि समकक्ष विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे शाळेच्या नव्या परिपूर्ण वास्तूत यशाचा तोच वारसा मोठ्या स्वरुपात सुरू राहील यात शंका नाही, असे सांगितले.