अवकाळीसह तापमान कालावधीबाबत अपेक्षाभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळीसह तापमान कालावधीबाबत अपेक्षाभंग
अवकाळीसह तापमान कालावधीबाबत अपेक्षाभंग

अवकाळीसह तापमान कालावधीबाबत अपेक्षाभंग

sakal_logo
By

rat१२p१५.jpg
55986
रत्नागिरीः शिळ येथे आंबा कलमांना आलेला मोहोर हंगामाची चाहूल देत आहे.
rat१२p१६.jpg
55987
मोहोर येण्यापूर्वी कलमांच्या फांदींना आलेले कोंब.
------------
अवकाळी, तापमान कालावधीत अपेक्षाभंग
आंबा, काजू पिकविमा योजना ; कुळांसह कराराने बागायती करणाऱ्यांना दिलासा
रत्नागिरी, ता. १२ः पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळबाग विमा योजना २०२२-२३ च्या हंगामासाठी लागू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू या फळपिकांचा समावेश आहे. अवकाळी पाऊस आणि कमाल तापमानाच्या कालावधीत बदल केलेला नसल्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. कुळाने किंवा भाडेपट्टीने बागा घेणारेही विमा उतरवण्यास पात्र ठरणार आहेत.
अंबिया बहर २०२२-२३ करिता रत्नागिरी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. यामध्ये काजू फळपिकाकरिता १ लाख संरक्षित रक्कमेसाठी विमा हप्ता ५ हजार (प्रति हेक्टर) असून योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. आंबा फळपिकाकरिता १ लाख ४० हजार संरक्षित रक्कमेसाठी विमा हप्ता १३ हजार ३०० रुपये (प्रति हेक्टर) असून योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२२ आहे. हवामान आधारित फळपिक विमा योजना बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र द्यावयाचे आहे. या योजनेत कुळाने घेतलेल्या किंवा भाडेपट्टीने करण्यात येणाऱ्या बागायतदारांनाही विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. कोकणात हजारो बागायतदार आंबा बागायती कराराने करतात. त्यांच्यासाठी हा दिलासा आहे.
योजनेमध्ये अवेळी पावसासाठी १ डिसेंबर ते १५ मे, कमी तापमान १ जानेवारी ते १० मार्च, जास्त तापमान १ मार्च ते १५ मे, गारपीट १ फेब्रुवारी ते ३१ मे हा कालावधी निश्‍चित केला आहे; परंतु गतवर्षी १६ मे रोजी अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला. शेवटच्या टप्प्यातील हाती आलेले पीक वाया गेले. कॅनिंगला आंबा कमी होता. त्यामुळे अवकाळी पावसाचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवण्याची मागणी केली होती; परंतु त्यामध्ये बदल न झाल्याने बागायतदारांचा अपेक्षाभंग झाला आहे तर मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात कडाक्याचे ऊन पडते त्यामुळे आंबा गळून जातो. या परिणामांचा अभ्यास करून निकष बनवण्याची मागणी बागायतदार करत आहेत. दरम्यान, केळी फळपिकासाठी १ लाख ४० हजार रुपये संरक्षित रक्कमेसाठी विमा हप्ता ७ हजार रुपये (प्रति हेक्टर) असून योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

चौकट
योजनेचे उद्दिष्ट्य
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा सरंक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पतपुरवठ्यात सातत्य राखणे, उत्पादनातील जोखमीपासून संरक्षण ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

कोट
एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकांसाठी चार हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमानोंदणी करण्याची मुभा आहे. जास्तीत जास्त बागायतदारांनी विमा उतरावा.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी