100 रुपयात रेशन कार्डधारकांना शिधाजिन्नस संच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

100 रुपयात रेशन कार्डधारकांना शिधाजिन्नस संच
100 रुपयात रेशन कार्डधारकांना शिधाजिन्नस संच

100 रुपयात रेशन कार्डधारकांना शिधाजिन्नस संच

sakal_logo
By

रेशनवर १०० रुपयांत
शिधाजिन्नस संच
२९ हजार लाभधारक ; राजापूर तालुक्यातील चित्र
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः यंदा दिवाळीनिमित्त अवघ्या शंभर रुपयांमध्ये रेशनिंग कार्डधारकांना ‘शिधाजिन्नस संच’ देण्याचा निर्णय राज्य शासनने घेतला आहे. त्या द्वारे सर्वसामान्य रेशनिंग कार्डधारकांना दिवाळी गिफ्ट मिळाले असून त्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे. या ‘शिधाजिन्नस संच’चा लाभ तालुक्यातील सुमारे २९ हजार रेशनिंग कार्डधारकांना होणार आहे.
राज्यातील सार्वजनिक व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्नयोजना, प्राधान्य कुटुंब, एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त अन्नधान्याव्यतिरिक्त शिधा जिन्नस संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना संबंधित पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपये दराने वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परस्थितीत निकृष्ट दर्जाच्या शिधावस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही शासनाने सूचित केले आहे. याचा लाभ तालुक्यातील सुमारे २९ हजार रेशनिंग कार्डधारकांना होणार आहे. या सर्व धान्यांचा समावेश असलेला एकत्रित शिधाजिन्नस संच देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला होता. मात्र, आता संचाऐवजी सुटे जिन्नस देण्यात येणार असून त्याचा लाभ तालुक्यातील सुमारे २९ हजार रेशनिंग कार्डधारकांना होणार असल्याची माहिती येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी निटुरे यांनी दिली.
-----------------------
चौकट ः
दृष्टिक्षेपात शिधाजिन्नस संच ः
रवा ः १ किलो
पामतेल ः १ लिटर
हरभरा डाळ ः १ किलो
साखर ः १ किलो
-----------
चौकट ः २

लाभार्थी कार्डधारक
कार्डधारक अंत्योदय प्राधान्य
राजापूर ३५६५ २०२६५
पाचल ७५० ५०५२
------------------------------
एकूण ४३१५ २५३१७
--------------------------