कणकवलीत खेळाडूंचा सत्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत खेळाडूंचा सत्‍कार
कणकवलीत खेळाडूंचा सत्‍कार

कणकवलीत खेळाडूंचा सत्‍कार

sakal_logo
By

56009
कणकवली : मुंबई विद्यापीठातील स्पर्धेत यश मिळविलेल्‍या खेळाडूंसोबत मान्यवर.

कणकवलीत खेळाडूंचा सत्‍कार

मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धेत यश

कणकवली, ता.१२ : मुंबई विद्यापीठातर्फे नुकतीच राज्‍यस्तरीय क्रीडा स्पर्धा झाली. यात कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या यशस्वी खेळाडूंचा सत्‍कार संस्थेच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते झाला.
कणकवली महाविद्यालयात जिमखाना विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, जिमखाना विभागप्रमुख प्रा. सत्यवान राणे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. युवराज महालिंगे, एनसीसी विभागप्रमुख डॉ. बी. एल. राठोड उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेत पिस्टल रायफल शूटिंग या प्रकारात अवधूत मेस्त्री, स्वप्नील कालेकर, प्रतीक मोरे आणि साहील पडवळ या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावले, तर ज्यूदो स्पर्धेत महेश शेख याला रौप्य पदक मिळाले. तसेच कोकण विभागीय आंतरमहाविद्यालय स्पर्धेत कुस्ती (मुले) शुभम सावंत, मेहक शेख (मुली) यांनी कांस्यपदक मिळवले, तर बॅडमिंटन स्पर्धेत अथर्व पोरे याची विद्यापीठ संघात निवड झाली. याशिवाय तायक्वाँदो क्रीडा प्रकारातून स्नेहा पाटील या विद्यार्थिनीस रजत पदक प्राप्त झाले. सर्व गुणवंत खेळाडू, गुणवंत एनसीसी छात्र, तसेच संघ व्यवस्थापक प्रा. सत्यवान राणे, डॉ. बी. एल. राठोड, प्रा. एम. जे. कांबळे, प्रा. प्रवीण कडूकर, प्रा. अदिती मालपेकर यांचा सत्कार झाला. डॉ. बी. एल. राठोड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सत्यवान राणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. युवराज महालिंगे यांनी आभार मानले.