राजापूर ः महिला ढोलपथकाला सिंधुदुर्गात शाबासकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः महिला ढोलपथकाला सिंधुदुर्गात शाबासकी
राजापूर ः महिला ढोलपथकाला सिंधुदुर्गात शाबासकी

राजापूर ः महिला ढोलपथकाला सिंधुदुर्गात शाबासकी

sakal_logo
By

rat12p11.jpg
55970
राजापूर येथील महिला ढोलपथक.
-----------------
महिला ढोलपथकाला सिंधुदुर्गात शाबासकी
स्पर्धेत सहभाग ; कौशल्यपूर्ण वादनाला दाद
राजापूर, ता. १२ः विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या शहरातील अनेक महिलांनी एकत्र येत महिला ढोलपथकाची काही वर्षापूर्वी स्थापना केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासह विविध उत्सवांमध्ये हे महिला ढोलपथक सहभागी होत असून या पथकाने सिंधुदुर्ग येथे झालेल्या ढोलवादन स्पर्धेमध्ये कौशल्यपूर्ण ढोलवादनाने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले होते.
विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या येथील महिलांनी एकत्र येत काही वर्षापूर्वी महिला ढोलपथकाची स्थापना केली. त्यामध्ये डॉ. छाया जोशी, डॉ. आरती प्रभूदेसाई, दीपाली पंडित, अनामिका जाधव, शिल्पा मराठे, सुप्रिया रहाटे, कल्याणी रहाटे, श्‍वेता आंबेकर, गौरी अभ्यंकर, साक्षी देसाई, डॉ. तृप्ती पाध्ये, डॉ. अनुजा राणे, श्रुती ताम्हणकर, अलका पाटणकर, सारिका गिरकर, रूपा केळकर, लिंगायत आदींसह अनेकांची महत्वपूर्ण भूमिका आणि योगदान राहिले. या महिलांसह डॉ. उत्तम प्रभूदेसाई यांच्यासह समाजातील अन्य मंडळींनीही गणवेशासह ढोल उपलब्धी आणि वाटचालीमध्ये विशेष सहकार्य केले. या महिलांसह समाजातील अन्य मंडळीनीही ढोल उपलब्धीसह गणवेशासाठी विशेष सहकार्य केले. पथकातील महिलांना ढोलवादनासह ताशावादनासाठी मधुकर गुरव, सुधाकर रहाटे, सदाशिव रहाटे यांच्यासह अन्य लोकांचे सहकार्य अन् मार्गदर्शन लाभले. शहरातील श्री निनादेवी मंदीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा राजापूर, मारूती मंदिर धर्मशाळा आदी ठिकाणी ढोलवादनाच्या तालमी केल्या. हे महिला ढोलपथक नुकतेच सिंधुदुर्ग येथील श्री सिद्धिविनायक नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या ढोलवादन स्पर्धेमध्ये डॉ. जोशी, जाधव, पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते.
या ढोलपथकातील पूजा आणि आदिती कुर्ले या भगिनींनी ढोलवादनाच्या चाली, त्यांचे पदन्यास, वेशभूषा, केशभूषा केल्या होत्या. पूजा कुर्ले, सोनल कुर्ले, गीता टिळेकर, ऋतिका खांबल, श्रेया शिंदे, सानिका वालेकर, रेश्मा भोगटे यांनी ढोलवादन केले, तर मानसी खांबल हिने निशाण नाचवले. त्याला आदिती कुर्ले, ऋतिक रहाटे, प्रशांत रहाटे यांनी ताशावादनाची साथ दिली. प्रिया कदम यांनी झांजवादनाची साथ दिली. या पथकाच्या ढोलवादन कौशल्याचे प्रेक्षकांसह परिक्षकांनीही कौतुक केले.