इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा
इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा

इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा

sakal_logo
By

इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा

११ नोव्हेंबरपासून आयोजन; जिल्हा बँक, मूर्तिकार संघ, भगीरथ प्रतिष्ठानचा पुढाकार


सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील बहुसंख्य मूर्तिकार स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले आहे.
गणेश मूर्तींच्या विसर्जनानंतर पर्यावरण अबाधित राहावे म्हणून सहज पाण्यात विरघळणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना जिल्हावासीयांनी करावी, हा संदेश या स्पर्धेतून द्यायचा आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मूर्तिकारांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून, भविष्यात पर्यावरणपूरक गणपती बनवणारा जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख व्हावी, असाही यामागील हेतू आहे. या स्पर्धेचे स्थळ ओंकार डीलक्स हॉल कुडाळ असून, प्रदर्शन कालावधी ११ ते १३ नोव्हेंबर असा रहाणार आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन ११ नोव्हेंबरला होणार असून, बक्षीस वितरण १३ नोव्हेंबरला होणार आहे. नाव नोंदविण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर राहील. हाती घडवलेल्या मूर्तीला प्राधान्य (साच्यातील मूर्तीही प्रदर्शनात ग्राह्य असेल). तयार केलेल्या मूर्तीमध्ये प्रमाणबद्धता सुबकता, कल्पकता आवश्यक, मूर्ती पूजनीय स्वरूपाची असावी, मूर्तीची उंची १८ ते ३६ इंच असावी (उंची मोजताना ती पाटापासून शेवटपर्यंत ग्राह्य धरण्यात यावी). पूजनीय मूर्ती तयार करताना मूर्तीचे अलंकार व इतर गोष्टी या मातीच्याच असाव्यात. त्यात कृत्रिमता आणू नये. प्रदर्शन स्थळापर्यंत मूर्ती ने-आण करण्याची जबाबदारी मूर्तिकाराची राहील. स्पर्धकाने मूर्ती ११ नोव्हेंबर दुपारी एकपर्यंत सभागृहात आणून द्यावी. मूर्तीची सुबकता, कौशल्य रेखणी, रंगसंगती या विषयांसाठी प्रत्येकी १ प्रमाणे ४ बक्षीस असतील.
--
चौकट
बक्षिसांचे स्वरूप असे
प्रथम ११ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय ७ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय ५ हजार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ २ बक्षिसे २,१०० व प्रमाणपत्र, विशेष कौशल्यासाठी एकूण ४ बक्षीस आहेत. १,१०० स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुकांनी बापू सावंत यांच्याशी संपर्क साधावा.