‘सेवा पंधरवडा’ मोहिमेस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सेवा पंधरवडा’ मोहिमेस 
नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
‘सेवा पंधरवडा’ मोहिमेस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

‘सेवा पंधरवडा’ मोहिमेस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

‘सेवा पंधरवडा’ मोहिमेस
नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा मोहिमेंतर्गत १० सप्टेंबर अखेर प्रलंबित विविध अर्ज तक्रारी व प्रकरणांचा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत निपटारा करण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र अनेक प्रकरणांत काही विभागांना निपटारा करणे शक्य झाले नाही. यासाठी सरकारने ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून या कालावधीत कोणत्याही स्थितीत सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे बंधन शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना घातले आहे. यामुळे लाभार्थींना आणखी एक संधी मिळाली आहे.
शासनाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्र परवाना तसेच विविध सेवा मुदतीत देण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. या पंधरावड्यात ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध ३९२ सेवा, महावितरण पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या २४, डीबीटी पोर्टलच्या ४६ सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा, विविध विभागाच्या स्वतःच्या योजनांची निगडी, पोर्टलवरील प्रलंबित अर्ज तसेच यासोबत विविध १४ विशेष सेवांमध्ये १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश होते. त्यानुसार पंधरवाड्याच्या पहिल्या दिवसापासून प्रलंबित प्रकरणांपैकी निकाली काढलेल्या प्रकरणांचा रोज आढावा घेण्यात आला. दरम्यान, पूर्वी १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच प्रत्येक दिवशी निकाली काढण्यात आलेल्या अर्ज, तक्रारी व प्रकरणांची माहिती शासनाने प्रत्येक विभागाकडून मागवली होती. मुदतवाढ दिल्यानंतर सरकारने लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची वयोगटानुसार माहिती मागवली आहे. आतापर्यंत ९० प्रलंबित प्रकरणाचा निपटारा झाला आहे. उर्वरित प्रकरणांचा ५ नोव्हेंबरपर्यंत निपटारा करण्यात येणार आहे.