पोमेंडी बुद्रूकमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोमेंडी बुद्रूकमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार
पोमेंडी बुद्रूकमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार

पोमेंडी बुद्रूकमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार

sakal_logo
By

rat१२p२२.jpg-
५६०१२
रत्नागिरी ः पोमेंडी ग्रामपंचायतीच्या प्रचारादरम्यान उपस्थित तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे आदी.
------------------
पोमेंडी बुद्रूकमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार
शेखर घोसाळे ; सर्व ११ जागा जिंकणार, १६ ला मतदान
रत्नागिरी, ता. १३ ः तालुक्यातील पोमेंडीबुद्रुक ग्रामपंचायत अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. सेनेच्या सत्तेने गावातील अनेक विकासकामे केली आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी प्रामाणिक असलेली येथील जनता आहे. त्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या तरी पोमेंडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा फडकवत एकहाती सत्ता मिळवू, असा ठाम विश्‍वास उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी तालुक्यात ३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. शिरगाव, कसोप-फणसोपसह पोमेंडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता मिळवणार्‍या शिवसेनेत सत्तांतर नाट्य घडल्यानंतर या तिन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तिन्ही ग्रामपंचायती काबिज करण्यासाठी कंबर कसलेली असताना पोमेंडी ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता मिळवण्याचा दावा घोसाळे यांनी केला आहे. येत्या १६ तारखेला तिन्ही ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पोमेंडी ग्रामपंचायतीची धुरा शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांच्या खांद्यावर आहे. या ग्रामपंचायतीतील ११ पैकी ११ जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा दावा घोसाळे यांनी केला.
गेल्या ५ वर्षात या ग्रामपंचायतीत विकासाभिमुख कामे केली. नळपाणी योजनेसह शासनाच्या अन्य योजनादेखील या गावात राबवल्या गेल्या. या कामाची पोचपावती मतदार या वेळी आम्हाला नक्कीच देतील. पोमेंडी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार ममता जोशी याच बाजी मारतील, असा विश्‍वास घोसाळे यांनी व्यक्त केला. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी या सर्वसामान्य जनतेला रुचलेल्या नाहीत. शिवसैनिक यापुढे प्रत्येक निवडणुकीत पेटून काम करेल, असे घोसाळे यांनी स्पष्ट केले.