चिपळूण-कष्टाला सन्मान देण्याची सवय लावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-कष्टाला सन्मान देण्याची सवय लावा
चिपळूण-कष्टाला सन्मान देण्याची सवय लावा

चिपळूण-कष्टाला सन्मान देण्याची सवय लावा

sakal_logo
By

ratchl122.jpg ः
55992
सावर्डे ः विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आमदार शेखर निकम व मान्यवर.
------------
कष्टाला सन्मान देण्याची सवय लावा
शेखर निकम ; सावर्डे आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
चिपळूण, ता. १२ः कौशल्यपूर्ण मनुष्यबळ हाच देशाच्या विकासाचा पाया असतो. औद्योगिक क्रांतीनंतर भारत देशात या मनुष्यबळाची कमतरता भासल्याने आयटीआयसारख्या शिक्षणाची सुरवात झाली. नवनवीन संकल्पना आत्मसात करून त्याचे परिपूर्ण शिक्षण व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती केली तर मोठ्या प्रमाणावर हे मनुष्यबळ देशाच्या विकासात हातभार लावते. त्यासाठी प्रथम कष्टाला सन्मान देण्याची सवय लावण्याची आवश्यक आहे, तरच आपले भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम यांनी सावर्डेतील कार्यक्रमात केले.
सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित आयटीआय सावर्डे येथे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. प्रास्ताविकात प्राचार्य उमेश लकेश्री यांनी आयटीआयची उज्ज्वल निकालाची परंपरा व इतिहास मांडला. पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले यांनी औद्योगिक क्रांतीनंतर आयटीआयसाठी असणारे महत्व, जपान व जर्मनीमध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
आमदार निकम म्हणाले, शिक्षणाचा व्यावहारिक जीवनात उपयोग करणे अत्यंत गरजेचे असून आयटीआय हा त्याचा प्राथमिक टप्पा आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आशादायी चित्र निर्माण करणारे व उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणारे हे शिक्षण घेण्याची तुम्ही तत्परता दाखवली.
आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत. कोकणातील विद्यार्थी नेहमीच अग्रेसर राहिला पाहिजे. या आयटीआयचा लौकिक वाढवावा, असे आवाहन करत प्राचार्य राजेंद्र वारे, संचालक शांताराम खानविलकर व अध्यक्ष बाबासाहेब भुवड यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. या वेळी संचालिका आकांक्षा पवार, मानसिंग महाडिक, आयटीआय कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत सुर्वे, सदस्य रज्जाक शेख, गुलाबराव सुर्वे उपस्थित होते.