डीबीजेत ''बायोक्रोम''प्रदर्शनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीबीजेत ''बायोक्रोम''प्रदर्शनाचे आयोजन
डीबीजेत ''बायोक्रोम''प्रदर्शनाचे आयोजन

डीबीजेत ''बायोक्रोम''प्रदर्शनाचे आयोजन

sakal_logo
By

rat११p१४.jpg-
55722
चिपळूण ः डीबीजेत ‘बायोक्रोम’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना मंगेश तांबे.

डीबीजेत ‘बायोक्रोम’ प्रदर्शनाचे आयोजन
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे ‘बायोक्रोम’ नामक एकदिवशीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपप्राचार्य डॉ. संजय गवाळे, रजिस्ट्रार डॉ. चांदा, नरेंद्र पेडमकर उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक गोष्टी साकारल्या होत्या. ‘अवयवदान व प्रतिकारशक्ती’ या विषयावर बायोरांगोळी काढून जनजागृती केली. किण्वन प्रक्रिया या विषयावर ‘फूडफेस्ट’ यावर आधारित वेगवेगळे पदार्थ तयार केले होते. त्यामधील जीवाणू प्रक्रिया त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले. जेनेटिक इंजिनिअरिंग व विषाणूशास्त्र, शेती जैवतंत्रज्ञान या विषयावर भित्तिपत्रके तयार केली. मंगेश तांबे मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी अशाच नवनवीन उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा. यातून अनेक गोष्टी शिकता येतील. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपक्रम राबवावेत.
---------
जुवाठीत बिबट्याकडून बैलाची शिकार
राजापूर ः गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील जुवाठी परिसरामध्ये जंगलासह लोकवस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तपणे वावर सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी जुवाठी येथील शेतकऱ्याच्या गुरांवर हल्ला करून त्यामध्ये एक बैल मारल्याची घटना घडली आहे. बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचा मुक्तपणे सुरू असलेला जुवाठी परिसरातील वावर यावर्षीही कायम राहिला आहे. जुवाठी येथील शेतकऱ्यांकडून जंगल परिसरामध्ये गुरे चरायला नेली जात आहेत. अशीच चरायला नेलेल्या एका शेतकऱ्याच्या गुरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. जंगलामध्ये गुरे चारण्यासाठी न्यायची की नाही, अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
-----------------