रत्नागिरी ः महिलांसाठी तत्पर आणि घरपोच सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः महिलांसाठी तत्पर आणि घरपोच सेवा
रत्नागिरी ः महिलांसाठी तत्पर आणि घरपोच सेवा

रत्नागिरी ः महिलांसाठी तत्पर आणि घरपोच सेवा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१२p२१.jpg-KOP२२L५६००३ रत्नागिरी ः फणसोप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी.
-------------

ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी...लोगो

वयोवृद्ध, विधवा महिलांसाठी घरपोच सेवा
राधिका साळवी ; फणसोप ग्रामपंचयीवर ठाकरे सेनेचाच भगवा फडणणार
रत्नागिरी, ता. १३ ः तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींमध्ये फणसोप ग्रामपंचायत उजवी दिसेल असा गावचा विकास साधण्यावर माझा भर आहे. दर्जेदार रस्ते, शाळा, पाखाड्या, स्ट्रीटलाईट, पाणीयोजना या पायाभूत सुविधांसह गावात नवनवीन योजना आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. गावातील वयोवृद्ध आणि विधवा महिलांना दाखले व इतर सेवा तत्पर व घरपोच देऊन त्यांचा बाणण्याचा माझा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या फणसोप सरपंचपदाच्या उमेदवार राधिका साळवी यांनी दिली.
तालुक्यातील फणसोप ग्रामपंचयतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. सदस्यपदाच्या ११ आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक १६ तारखेला होणार आहे. उपतालुकाप्रमुख राकेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली ११ पैकी ४ जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बिनविरोध जिंकल्या तर २ जागा बिनविरोध करण्यात आल्या आहेत. थेट सरपंचपदासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राधिका साळवी रिंगणात आहेत. साळवी यांच्याकडे सरपंचपदाचा मोठा अनुभव आहे. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी गावाचा पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावला. ३० लाखांच्या निधीतून कोळंबा ते बौद्धवाडीसाठी पाणीयोजना केली. याशिवाय ग्रामपंचायतीत दाखल्यांसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना तत्काळ दाखले वितरण ही संकल्पना त्यांनी राबवली. पुढच्या कालावधीत गावातील सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देऊन सांडपाण्याचा प्रश्न निकाली लावण्याचा निर्धार साळवी यांनी सोडला आहे.
फणसोप सडा आणि कासोपसडा येथील नळपाणी योजना मार्गी लावण्यासह असलेल्या नळपाणी पाणीयोजनांचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गावात उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील काळात वयोवृद्ध आणि विधवा महिलांसाठी ग्रामपंचायतीमार्फत घरपोच सेवा देण्याचा निश्चय असल्याचे साळवी यांनी सांगितले. अशा व्यक्तींनी ग्रामपंचायतीकडे कामासाठी संपर्क करावा. ग्रामपंचायतकडून या व्यक्तींना घरी जाऊन सेवा दिली जाईल.

कोट...
आगामी काळात त्यांनी गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांना आरोग्य आणि शैक्षणिक सेवा या दर्जेदार आणि तत्परतेने देण्यावर भर दिला आहे. उपतालुकाप्रमुख म्हणून काम करताना मी कधीही आणि कुठेही मदतीसाठी धावून जातो हे ग्रामस्थांना माहिती आहे. म्हणून फणसोपची जनता आपल्या आणि पक्षासोबत जोडली गेली आहे. यापुढे देखील सर्वसामान्यांसाठी असेच झटत राहू. त्यामुळे फणसोप ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचाच भगवा फडकणार.
-राकेश साळवी, उपतालुकाप्रमुख, रत्नागिरी