विद्युत कर्मचारी संघटनेचे रत्नागिरीत आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत कर्मचारी संघटनेचे रत्नागिरीत आंदोलन
विद्युत कर्मचारी संघटनेचे रत्नागिरीत आंदोलन

विद्युत कर्मचारी संघटनेचे रत्नागिरीत आंदोलन

sakal_logo
By

rat१२p१९.jpg
५५९९०
रत्नागिरीः महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करणारे कर्मचारी.
--------------
विद्युत कर्मचारी संघटनेचे
रत्नागिरीत आंदोलन
रत्नागिरी, ता. १२ः राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्याला रत्नागिरीच्या कार्यकारिणीने पाठिंबा देत महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
वीज कायदा दुरुस्ती विधेयक २०२२ हे संविधानविरोधी, राज्याच्या हिताच्या विरोधात तसेच मागासवर्गीयांच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्यामुळे त्यास महाराष्ट्र शासनातर्फे विरोध करण्यासाठी वीज कंपन्यांनी प्रस्ताव पाठवावा, नवी मुंबई व इतर तीन जिल्हे अडाणी कंपनीला देण्यासाठी केंद्र सरकारने काढलेले अन्यायकारक नोटिफिकेशन त्वरित रद्द करण्यासाठी महावितरणने राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, गट विमा योजनेचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार वीज कर्मचाऱ्यांवर न लादता या योजनेअंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सेवेचे फायदे तिन्ही कंपन्यांनी स्वतःच्या महसुलातून देण्याची कार्यवाही करावी, तिन्ही वीज कंपन्यांमधील मागासवर्गीय कर्मचार्‍यांची विनंती बदलीची सर्व प्रलंबित प्रकरणे निकालात करण्यात यावीत, महावितरणमध्ये सरळसेवा भरतीप्रक्रिया राबवताना विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, लेखा सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता स्थायी स्वरूपात भरण्यात यावीत, अशा अनेक मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मंगळवारी छेडण्यात आले.
संजय तांबे, नीलेश आंबेकर, सुनील गोसावी, अनंत सावर्डेकर, मिलिंद कांबळे, योगेश पडवळ, विनोद चव्हाण, अमित मेस्त्री, सुनील शिरोडकर, मनोज माने, राजेंद्र जाधव, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.