शिशूविहारमध्ये भोंडला स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिशूविहारमध्ये भोंडला स्पर्धा उत्साहात
शिशूविहारमध्ये भोंडला स्पर्धा उत्साहात

शिशूविहारमध्ये भोंडला स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

विन्सेंट व्हॅनगॉगच्या चित्रांचे नाट्यानुभव
साडवलीः विसाव्या शतकातील सुप्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट व्हॅनगॉग याच्या चित्रांचा एक अभिनव नाट्यानुभव देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, डी-कॅड येथे रविवारी (ता. १६) तारखेला सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. व्हॅनगॉगचा दृष्यानुभव त्याच्या चित्रात परावर्तित होताना पाहणाऱ्यालाही त्याची अनुभूती येते. याचे लेखक आयव्हिंग स्टोन असून अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी अनुवाद केला आहे. संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन शेखर नाईक यांच्या या निर्मितीचा अनुभव व्हॅनगॉगच्या चित्रामधील दृकश्राव्य तसेच भाव यांचा प्रवास घडवणारा आहे. संगीत चैतन्य आडकर, प्रकाशयोजना प्रणव सकपाळे, दृकश्राव्य संयोजन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. यामध्ये अश्विनी गिरी, धीरेश जोशी, सई लिमये, अमृत सामक अभिवाचन करणार आहेत. हा कार्यक्रम कलारसिकांसाठी, कलेच्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. कलाप्रेमींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य रणजित मराठे यांनी केले आहे.
-----------
भाजपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
चिपळूणः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सर्वत्र सेवा पंधरवडा कार्यक्रम सुरू होतो. चिपळूण शहर भाजपअंतर्गत या कार्यक्रमाची सांगता जिल्हा परिषद शाळा मुरादपूर येथे मुलांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करून झाली. जिल्हा चिटणीस वैशाली निमकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शहराध्यक्ष आशिष खातू, शहर सरचिटणीस मधुकर निमकर, युवामोर्चा सरचिटणीस मंदार कदम, शिक्षक उपस्थित होते.
--------
ratchl१२३.jpg
56026
चिपळूणः विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
------------
शिशूविहारमध्ये भोंडला स्पर्धा उत्साहात
चिपळूण ः परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित शिशूविहार विभागात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. शिशूविहार विभागात नऊ दिवस देवीची पूजा करून नवरात्रोत्सव साजरा झाला. यामध्ये सरस्वती पूजन भोंडला, पाटीपूजन असे विविध कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांना भोंडला (हादगा) या सणाविषयी माहिती व महत्व कळण्यासाठी भोंडल्याची विविध पारंपरिक गाणी म्हणून भोंडला साजरा करण्यात आला. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी मायलेकरू भोंडला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बहुसंख्य पालक व विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण समिधा आठल्ये यांनी केले.
--------
विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप
दाभोळ ः राष्ट्रीय जंतनाशकदिनाचे औचित्य साधून आरोग्य उपकेंद्र माटवणअंतर्गत कार्यक्षेत्रातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. जंतांचा प्रादुर्भाव कशा व कोणत्या पद्धतीने होतो, त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी कोणत्याप्रकारे आपली काळजी घेतली पाहिजे याबाबत आरोग्य विभागातील स्वप्नील जोशी यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शासनाने सुरू केलेल्या जंतनाशक मोहिमेचे उद्देश व त्यापासून मिळणारे फायदे याबाबत या वेळी मार्गदर्शन करण्यात आले.
--------------
रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारा
दाभोळः अनेक रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने अपघात होत असल्याने या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात यावेत, असे निवेदन दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील संतोष अबगुल यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले होते. त्यांच्या निवदेनाची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्त्यावर जेथे गतिरोधक आहेत अशा ठिकाणी पांढर्‍या थर्मी पट्ट्या मारण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशा सूचना जि. प. बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना दिल्या आहेत.
----------------
rat१२p२६.jpg
56028
दापोलीः येथील बसस्थानकात असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या जमा करण्याच्या पिंजऱ्याची स्वच्छता करणारे विद्यार्थी.
--
राष्ट्रीय सेवा स्वयंसेवकांकडून स्वच्छता
दाभोळ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीअंतर्गत कृषी महाविद्यालय दापोलीच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दापोलीतील प्लास्टिक बाटल्या जमा करावयाच्या पिंजऱ्यांची स्वच्छता आणि रंगकाम करण्यात आले. दापोली शहरात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करून त्यांचा पुनर्वापर करता यावा या हेतूने ७ ठिकाणी लोखंडी पिंजरे उभारले आहेत. यामध्ये बसस्थानक, केळसकर नाका, सानेगुरूजी बालोद्यान, शासकीय रुग्णालय या ठिकाणांचा समावेश आहे. हे पिंजरे अस्वच्छ झाल्याने त्यांची सफाई आणि सुशोभीकरणाचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले. समाजाच्या विविध स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक झाले.
-----------