दहा क्षयरुग्णांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले दत्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा क्षयरुग्णांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले दत्तक
दहा क्षयरुग्णांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले दत्तक

दहा क्षयरुग्णांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले दत्तक

sakal_logo
By

दहा क्षयरुग्णांना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले दत्तक
टीबी मुक्त भारत अभियान ; ३ वर्षात ४ हजार १९९ क्षयरुग्णांना योजनेचा लाभ
रत्नागिरी, ता. १२ः प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांच्या मदतीसाठी त्यांच्यावर उपचारांच्या सहकार्यासाठी दत्तकत्व घेण्यास आता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी पुढे झाले आहेत. आतापर्यंत १० क्षयरुग्णांचे दत्तकत्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारले आहे.
क्षयरोग झालेल्या रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी केंद्र शासनाने निक्षय पोषण योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने क्षयरोगावरील औषध उपचार घेणाऱ्या रुग्णांकरिता निक्षय पोषण योजना सुरू केली आहे. रुग्णांना सकस आहार मिळावा हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेंतर्गत शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर औषधोपचार घेणाऱ्या रुग्णास प्रति महिना ५०० रुपये पोषण आहार भत्ता दिला जातो. याची रक्कम संबंधित रुग्णाच्या बँकखात्यावर जमा केली जाते; परंतु ही मदत अत्यंत अल्प असून या खेरीज अन्न पुरवठा व इतर सुविधा सहकार्य देणे आवश्यक आहे.
जेणेकरून रुग्णांची प्रकृती तप्तरतेने पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावरून निक्षय मित्र होऊन रुग्णांना सहकार्य करण्याबाबत जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागस्तरावरून आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय टीबी फोरम सभेमध्ये जिल्हाधिकारी यांनीही सर्व खासगी औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांना जास्तीत जास्त निक्षय मित्र होण्यासाठी आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे, डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. महेंद्र गावडे, डॉ. वसिम सय्यद, डॉ. आर. बी. शेळके, संतोष गुट्टे, के. एन. बिराजदार, तुषार साळवी, सुहास गुरव, एस. आर. तुपे यांनी रत्नागिरी तालुक्यातील काही क्षयरुग्ण दत्तक घेतले आहेत व या अधिकारी व कर्मचारीमार्फत रुग्णांना उपचार सुरू असेपर्यंत पोषक आहार पुरवला जाणार आहे.
जिल्ह्यात गेल्या ३ वर्षात ४ हजार १९९ क्षयरुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. १ जानेवारी २०२२ ते आतापर्यंतच्या कालावधीत १ हजार ३३१ क्षयरोगग्रस्तांना निक्षय पोषण योजनेचा लाभ मिळाला आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर शासनाकडून दिला जाणारा भत्ता जमा करण्यात आला आहे.

चौकट
वर्ष एकूण क्षयरुग्ण लाभार्थी टक्केवारी
२०२० १७८५ १४८३ ८३.०८
२०२१ १८६९ १३८५ ७४.१०
२०२२ १८४३ १३३१ ७२.२२