चौकेकर, पेंडुरकरांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकेकर, पेंडुरकरांची निवड
चौकेकर, पेंडुरकरांची निवड

चौकेकर, पेंडुरकरांची निवड

sakal_logo
By

टीपः swt१२२६.jpg मध्ये फोटो आहे.
विजय चौकेकर, रुपाली पेंडुरकर

चौकेकर, पेंडुरकरांची निवड
मालवण : निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी विजय चौकेकर, तर सचिवपदी रुपाली पेंडुरकर यांची निवड करण्यात आली. निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा मालवणची सर्वसाधारण सभा उत्तम कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या सभेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी अशी ः खजिनदार सुरेश चव्हाण, उपाध्यक्ष ज्ञानदेव ढोलम, शामसुंदर माळवदे, सदस्य भानुदास तळगावकर, जयश्री हडकर, शादीबाबी शेख, विशाखा तारी, रमेश आचरेकर, प्रकाश चव्हाण, श्रीकृष्ण पाडगावकर, सदाशिव गावडे, नरेश पालव. यावेळी जिल्हा सदस्य कृष्णा पाताडे, प्रताप बागवे आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर व जिल्हा सचिव सुंदर पारकर यांनी कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
............
देवगड ‘सेल्फी पॉईंट’चे आज लोकार्पण
देवगड : येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीतर्फे येथील बस स्थानकासमोरील बालोद्यानमध्ये उभारण्यात आलेल्या ‘सेल्फी पॉईंट’चे लोकार्पण उद्या (ता. १३) सायंकाळी सहाला खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग युवासेना अधिकारी सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटन नीलम सावंत-पालव, सतीश सावंत, अतुल रावराणे आदी उपस्थित रहाणार आहेत. संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी केले आहे.