जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय लोकअदालत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये 
राष्ट्रीय लोकअदालत
जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय लोकअदालत

जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय लोकअदालत

sakal_logo
By

जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये
राष्ट्रीय लोकअदालत
ओरोस, ता. १२ ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ मधील तरतुदीअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत सिंधुदुर्ग येथील न्यायालय व मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय सिंधुदुर्ग या न्यायालयांतील प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमधील प्रलंबित असलेली प्रकरणे विनाविलंब निर्णय मिळण्यासाठी तसेच सामंजस्याने तडजोडीसाठी प्रकरणे ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षातील ही चौथी राष्ट्रीय लोकअदालत आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांबरोबरच वादपूर्व प्रकरणे ज्यामध्ये विविध बँका, पतसंस्था, वीज वितरण कंपनी, नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्याकडील थकीत रकमेबाबतची प्रकरणे, पोलिस ठाण्यातील वाहतूक विभाग यांनी वाहनांवर केलेली दंडात्मक कारवाई वसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आलेली आहेत. तसेच ग्राहक मंचाकडील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश आहे.