महसूल सचिवांचे मालवणात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महसूल सचिवांचे मालवणात स्वागत
महसूल सचिवांचे मालवणात स्वागत

महसूल सचिवांचे मालवणात स्वागत

sakal_logo
By

महसूल सचिवांचे मालवणात स्वागत
मालवण : केंद्राचे महसूल सचिव तरुण बजाज हे जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मालवण कस्टम कार्यालय येथे भेट घेऊन स्वागत केले. महसूल सचिव बजाज हे किनारपट्टीवरील कस्टम विभागाच्या बैठकांसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. मालवणातील कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते देवगड येथे रवाना झाले. येथील भेटीवेळी तहसीलदार अजय पाटणे, मंडळ अधिकारी पी. डी. लोबो, तलाठी विजय पास्ते आदी अधिकारी उपस्थित होते. कस्टम विभागाच्या कामकाजासंदर्भात या दौर्‍यात माहिती घेण्यात आल्याचे समजते. या विभागातील सुरक्षेसंदर्भातील कामकाजाबाबत चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे.
------------
देवगडला शनिवारी विकासात्मक चर्चा
देवगड ः राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १५) सकाळी दहाला येथील कार्यालयात तालुक्यातील विकासकामांविषयी चर्चा करण्यात येणार आहे. स्थानिक मच्छीमारांचा डिझेल परतावा व अन्य समस्या, देवगड जामसंडे शहराचा नळ पाणीपुरवठा प्रश्‍न तसेच संघटना वाढीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. यावेळी सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विलास साळसकर यांनी केले आहे.
---
शेतकऱ्यांना भातकापणीसाठी कोयती
मालवण ः वरची गुरामवाडीच्या सरपंच स्वाती वाईरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत भात कापणीसाठी मोफत कोयती वाटप केले. सुमारे २०० शेतकऱ्यांना कोयत्यांचे वाटप करण्यात आले.