जयगड खाडीत ऑइल ड्रिलिंग रिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयगड खाडीत ऑइल ड्रिलिंग रिंग
जयगड खाडीत ऑइल ड्रिलिंग रिंग

जयगड खाडीत ऑइल ड्रिलिंग रिंग

sakal_logo
By

rat12p30.jpg
L56081
जयगड खाडीत आलेली ऑइल ड्रिलिंग रिंग
------------------
जयगड खाडीत ऑइल ड्रिलिंग रिंग
दुरूस्ती की पार्किंगसाठी हे गुलदस्त्यात
रत्नागिरी, ता. १२ : ओएनजीसीचे (ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) भुगर्भातील नैसर्गिक तेल व गॅसच्या विहिरी शोधण्यासाठी वापरण्यात येणारे मोठे युनिट तालुक्यातील जयगड खाडीमध्ये दाखल झाले आहे. ऑइल ड्रिलिंग रिंग असे त्याचे नाव असून जहाजाच्या मदतीने ते खाडीत ओढुन आणले आहे. रिंग पार्किंगसाठी की, दुरूस्तीसाठी आली याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु ती विनापरवाना बंदरात आणल्याचे समजते.
जयगड खाडीमध्ये आज सायंकाळी ओएनजीसीची ही ऑइल ड्रिल रिंग दाखल झाली आहे. सायंकाळी सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे याबाबत अनेकांच्या मनात उत्कंठा आहे की रत्नागिरीतील समुद्रात नैसर्गिक तेलाच्या विहिरी सापडल्या की काय. परंतु असा काही प्रकार नाही. तेथील काही अधिकारी आणि पोर्टच्या अधिकाऱ्यांना विचारले असता याबाब काही माहिती नसल्याचे सांगितले. विनापरवाना ही रिंग जयगड खाडीत आली आहे. दुरूस्तीसाठी ती आली असावी, असा अंदाज आहे. ज्या कंपनीची ही रिंग आहे. ती विनापरवाना जयगड खाडीत आली आहे की परवानगी घेऊन आली आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. परंतु बंदर विभागाच्या अधिकाऱ्याशी परवानगीवरून वाद झाल्याचे समजते.

चौकट
अनेकांच्या भूवया उंचावल्या
या रिंगद्वारे नैसर्गिक तेलाच्या विहिरींचा शोध केला जातो. ओएनजीसीच्या माध्यमातून राज्यात ठिकठिकाणी तेलासाठी विहीरी खणल्या जात आहेत. महागलेल्या इंधनदराच्या काळात भारतीय भूमीत तेल मिळवण आणि त्याचे उत्पादन वाढवणे हे दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्याअनुषंगाने समुद्रातील नैसर्गिक तेलाच्या विहिरी शोधण्याचे काम ओएनजीसीकडुन सुरू आहे. अशा स्थितित तालुक्यातील जगड खाडी परिसरात ऑइल ड्रिलिंग रिग दाखल झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.