तुरूंगाधिकारी पोतदार यांच्या मुलाखतीतून प्रेरणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुरूंगाधिकारी पोतदार यांच्या मुलाखतीतून प्रेरणा
तुरूंगाधिकारी पोतदार यांच्या मुलाखतीतून प्रेरणा

तुरूंगाधिकारी पोतदार यांच्या मुलाखतीतून प्रेरणा

sakal_logo
By

तुरूंगाधिकारी पोतदार यांच्या मुलाखतीतून प्रेरणा

रत्नागिरी ः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या स्टुडंट कौन्सिलतर्फे जिल्हा विशेष कारागृहाचे सहाय्यक तुरुंगाधिकारी अमेय पोतदार यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. स्टुडंट कौन्सिल मेंटॉर प्रा. डी. आर. वालावलकर यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक ए. एम. कुलकर्णी यांनी अतिथींचे स्वागत केले. बारावी विज्ञानमधील स्टुडंट कौन्सिल सदस्य श्रेयस रसाळने मुलाखत घेतली. पोतदार यांनी बालपणापासून प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास उलगडला. रत्नागिरीतील विशेष कारागृहाबद्दल अधिक माहिती दिली आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीच्या नूतनीकरणाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. सोबतच खुले कारागृह आणि बंदिवानांसाठी अर्थार्जनाचे प्रकल्प, बंदिवानांचे समुपदेशन आदी संकल्पनांबाबत स्वानुभव कथन केले. कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमास विज्ञान विभागप्रमुख प्रा. सुनील गोसावी व प्रा. ऋणा नागवेकर आणि विज्ञान विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते.