सिंधुदुर्गवासीयांना सर्वतोपरी सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गवासीयांना सर्वतोपरी सहकार्य
सिंधुदुर्गवासीयांना सर्वतोपरी सहकार्य

सिंधुदुर्गवासीयांना सर्वतोपरी सहकार्य

sakal_logo
By

swt132.jpg
56133
वेंगुर्लेः युवा उद्योजक विशाल परब यांचा सत्कार करताना आमदार जीत आरोलकर, संजू परब, दिलीप गिरप, अॅड. निरवडेकर आदी.

सिंधुदुर्गवासीयांना सर्वतोपरी सहकार्य
जीत आरोलकरः वेंगुर्लेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ः वेंगुर्ले तालुक्याच्या शेजारी माझा मतदार संघ आहे. त्यामुळे गोव्यात कामासाठी येणाऱ्या येथील मुलांना तसेच येथील जिल्हावासीयांना कुठलीच अडचण येऊ देणार नाही, असे प्रतिपादन मांद्रे (गोवा) विधानसभा मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी केले. ते वेंगुर्ले येथे आयोजित ‘विशाल श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
भाजपचे युवा नेतृत्व तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्लेतील मधुसुदन कालेलकर सभागृहात दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून गोव्याचे आमदार आरोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. युवा उद्योजक विशाल परब, भाई सावंत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, ओरोस भाजप मंडल अधिकारी दादा साईल, अक्रम खान, प्रीतेश राऊळ, भाई राणे, राजन गिरप, दादा साईल, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, अनंत परब, किशोर सोन्सुरकर, प्रणव वायंगणकर, प्रशांत आपटे, बाळू देसाई, अॅड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.
आमदार आरोलकर म्हणाले, ‘‘परब यांच्यामध्ये तेज आहे. म्हणून मी त्यांना ‘स्पार्कींग मॅन’ असे नाव देतो. भविष्यात ते खासदार किंवा आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. त्यांच्यासारखा मित्र लाभला हे मी भाग्य समजतो. परब यांनी अल्पावधीत जीवनात जे यश मिळविले, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामागे त्यांची जिद्द आणि कठोर मेहनत आहे.’’
यावेळी परब यांनी दान करण्याचे वरदान मला माझे गुरू खासदार नीलेश राणेंकडून मिळाले. भविष्यात सर्व क्षेत्रात काम करताना सर्वांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणार आहे. सामाजिक, राजकीय तसेच उद्योग क्षेत्रात वाटचाल करताना सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.