सामाजिक वनीकरणातून वन्यजीवांची सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक वनीकरणातून वन्यजीवांची सेवा
सामाजिक वनीकरणातून वन्यजीवांची सेवा

सामाजिक वनीकरणातून वन्यजीवांची सेवा

sakal_logo
By

swt134.jpg
56134
तळेरेः वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल बेलवलकर यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र : एन. पावसकर)

सामाजिक वनीकरणातून वन्यजीवांची सेवा
वनक्षेत्रपाल बेलवलकरः तळेरेत वन्यजीव संरक्षण सप्ताह साजरा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ : सामाजिक वनीकरण विभागातील कार्य म्हणजे वन्यजीवांची सेवा करण्याची उत्तम संधी आहे. निसर्गावर अतिक्रमण करून नव्हे, तर अनुकूलन साधून जगा व जगू द्या, असे प्रतिपादन वनक्षेत्रपाल बेलवलकर यांनी केले.
तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवली, सामाजिक वनीकरण विभाग कणकवली यांच्यावतीने ‘वन्यजीव संरक्षण सप्ताह’ पार पडला. तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई व विद्यालयातर्फे प्रभारी मुख्याध्यापक सी. व्ही. काटे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल बेलवलकर, प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवलीचे वनपाल अमित जाधव, इंदूलकर, कासार्डे वनरक्षक एम. पी. शेगावे, फोंडा वनरक्षक अतुल खोत, घोणसरी वनरक्षक अतुल पाटील, सर्प इंडियाचे पाटील, राजेश भोगले, मंदार राणे, शिक्षिका डी. सी. तळेकर, प्रा. ए. बी. कानकेकर, एन. बी. तडवी, पी. एन. काणेकर, पी. एम. पाटील, व्ही. डी. टाकळे, ए. पी. कोकरे, एन. पी. गावठे, ए. बी. तांबे, एस. यू. सुर्वे, एस. बी. जाधव, कनिष्ठ लिपिक के. डी. तळेकर, देवेंद्र तळेकर, संदेश तळेकर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी वनरक्षक खोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वन्यजीवांचे महत्त्व व त्यांचे रक्षण याबाबत माहिती दिली. सर्प इंडियाचे प्रतिनिधी राजेश भोगले यांनी पोस्टर व प्रोजेक्टरच्या सहाय्याने सरीसृप वर्गातील प्राण्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. सरपटणाऱ्या प्राण्यांविषयीची अनाठायी भीती कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी व प्राथमिक उपायांबाबत मंदार राणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आभार प्राध्यापिका ए. बी. कानकेकर यांनी मानले.