कर्मचारी पतसंस्थेच्या नवनियुक्त संचालकांचा सिंधुदुर्गनगरीत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी पतसंस्थेच्या नवनियुक्त संचालकांचा सिंधुदुर्गनगरीत सत्कार
कर्मचारी पतसंस्थेच्या नवनियुक्त संचालकांचा सिंधुदुर्गनगरीत सत्कार

कर्मचारी पतसंस्थेच्या नवनियुक्त संचालकांचा सिंधुदुर्गनगरीत सत्कार

sakal_logo
By

५६१३५

swt१३५.jpg

कर्मचारी पतसंस्थेच्या नवनियुक्त
संचालकांचा सिंधुदुर्गनगरीत सत्कार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या ९ ला पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांचा सिंधुदुर्ग जिल्हा परिचर चालक संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा मुख्यालयातून निवडून आलेल्या नवीन संचालकांचा सत्कार करीत पुढील पाच वर्षे चांगले काम करण्याच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत परिचर चालक संघटनेचे न्हानू दळवी, गीतांजली वालावलकर हे विजयी झाले. या संचालकांसह जिल्हा मुख्यालयातून निवडून आलेले अमित तेंडोलकर, श्रीकृष्ण मुळीक, संतोष परब, विठ्ठल मालंडकर, शमिका घाडीगांवकर तसेच बिनविरोध निवडून आलेले आनंद चव्हाण या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे माजी राज्य कार्याध्यक्ष दिलीप सावंत, विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष बी. एच. नेरूरकर, सदस्य कन्हैया फाले, मनीषा पाटील, खजिनदार आर. पी. कुवळेकर यांच्यासह प्रीती कामतेकर, सीताराम तावडे, बी. एस. तेंडुलकर, भगवान सावंत, राखी मळेकर, बाळकृष्ण तांबे, महेंद्र पारकर, नाना कोचरेकर, प्रतीक देवकर, करुणा ठाकूर, कमलेश वनकर, दीपक पेडणेकर, महादेव सावंत, कृष्णा टेमकर, सीताराम तांडेल आदी उपस्थित होते.