लांजा-जावडेत मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-जावडेत मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
लांजा-जावडेत मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद

लांजा-जावडेत मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद

sakal_logo
By

जावडेत मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद
लांजा, ता. १३ ः हेरीटेज संस्थेने जावडे येथे आयोजित पत्रकार योगेश अनंत पवार स्मृती आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण जावडे येथे झाले.
पत्रकार योगेश अनंत पवार यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या वतीने आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा झाली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचा शुभारंभ मठचे माजी सरपंच सुभाष पवार व जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे जनसंपर्क अधिकारी राजन बोडेकर यांच्या हस्ते झाला. या वेळी हेरीटेज संस्थेच्या अध्यक्षा अपर्णा पवार, जावडे हायस्कूल व आश्रमशाळा संस्थापक संतोष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुर्वे आदी उपस्थित होते. सुभाष पवार यांनी पत्रकार योगेश पवार यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले. अपर्णा पवार व संतोष कांबळे यांनी जावडे येथे उभे केलेले शैक्षणिक संकुल तालुक्याला भूषणावह असून गोरगरीब व भटक्या विमुक्त जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा म्हणजे एक आधारस्तंभ असल्याचे सांगितले. आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा ६ ते ८, ८ ते १०, ११ ते १४ आणि १५ ते १७ या वयोगटानुसार घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बक्षीस वितरण समारंभात वयोगटानुसार प्रथम पाच क्रमांक प्राप्त केलेल्या मुलांना व मुलींना प्रमाणपत्र व मेडल देवून गौरविण्यात आले.