मंडणगड-डॉ. आंबेडकर महाविद्यालयात संविधान गौरव स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड-डॉ. आंबेडकर महाविद्यालयात संविधान गौरव स्पर्धा
मंडणगड-डॉ. आंबेडकर महाविद्यालयात संविधान गौरव स्पर्धा

मंडणगड-डॉ. आंबेडकर महाविद्यालयात संविधान गौरव स्पर्धा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat13p7.jpg-22L56151
आंबडवे : नुरखा पठाण यांनी लिहिलेल्या ''आपले संविधान'' या पुस्तकाचे वाटप प्रसंगी प्राध्यापक व विद्यार्थी.
-----------

आंबडवेत संविधान गौरव स्पर्धा
मंडणगड ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात 26 नोव्हेंबरला होणाऱ्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त संविधान गौरव स्पर्धा आंबडवे येथे होणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे या स्पर्धेचे केंद्रप्रमुख अरुण ढंग यांनी दिली. याप्रसंगी नुरखा पठाण यांनी लिहिलेल्या आपले संविधान या पुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर म्हणाले, सर्व विद्यार्थी व जनतेला संविधानाप्रति जागरूक करणे, त्यांच्यात संविधान विषयक चिकित्सा निर्माण करणे, प्रत्येक घरात संविधान पोहचवणे, विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धसाठी महाविद्यालयातून ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून इच्छूकांनी महविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समन्वयक डॉ. अंशुमन मगर यांनी केले आहे.