रत्नागिरी-जिल्ह्यात 2 लाख 75 हजार कार्डधारकांची दिवाळी गोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जिल्ह्यात 2 लाख 75 हजार कार्डधारकांची दिवाळी गोड
रत्नागिरी-जिल्ह्यात 2 लाख 75 हजार कार्डधारकांची दिवाळी गोड

रत्नागिरी-जिल्ह्यात 2 लाख 75 हजार कार्डधारकांची दिवाळी गोड

sakal_logo
By

NGP20D67602--संग्रहित

पावणे तीन लाख कार्डधारकांची दिवाळी गोड

जिल्ह्यात मिळणार १०० रुपयात ४ शिधा वस्तू ; रवा, चणा डाळ, साखर, पाम तेल
राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारांना यंदाची दिवाळी गोड होणार आहे. या दिवाळीला एकनाथ शिंदे सरकारने १०० रुपयामध्ये शिधा वस्तूंचे पॅकेज जाहीर केले आहे. यात रवा, चणा डाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पाम तेलाचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फ २ लाख ७५ हजार कार्डधारकांनी या योजनेचा लाभ होणार आहे.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी हे शिधा पॅकेज जाहीर केले असून त्याचे वितरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील २ लाख ७५ हजदार ८५७ लाभांर्था शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाख घेत आहेत. यात अंत्योदय रेशनकार्डधारकांची संख्या ३८ हजार ७०० आहे. तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांची संख्या २ लाख ३७ हजार आहे. शासनान ४ ऑक्टोबरला १०० रुपयामध्ये चार वस्तू दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील २ लाख ७५ हजार कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. रवा, चणा डाळ, साखर आणि पाम तेल अशा त्या वस्तू असून प्रत्येक रेशन दुकानावर त्या मिळणार आहेत. शासनाकडुन ही दिवाळी भेट असल्याने चारही वस्तू एकत्रिक पॅकबंद मिळणार आहेत. शुक्रवारपासून (ता. १४) या योजनेचे वितरण करण्याचे नियोजन आहे. मात्र पुरवठा विभागाकडे अजून या वस्तू आलेल्या नाहीत. फक्त साखरेचा साठा पुरवठा विभागाला आला आहे. उर्वरित वस्तू आल्यानंतर त्यांचा एकत्रित संच करून रेशन दुकानातून त्याचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचरसंहिता सुरू आहे. त्यामुळे त्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दुकानांमध्ये २० ऑक्टोबरनंतर हे वितरण होणार आहे. पॉस मशिनद्वारेच या एकत्रिक शिधा वस्तूंचे वितरण होणार आहे.
-------------------
चौकट-
तालुकानिहय लाभार्थ्यांची आकडेवारी-
मंडणगड - १३,८८९
दापोली - २९, ९३९
खेड - ३०,६६७
गुहागर - २०, ८३६
चिपळूण- ४४,९९९
संगमेश्वर - ३५,४५२
रत्नागिरी - ५१,८५६
लांजा -१८,५७७
राजापूर - २९,६३७
-----------------------
एकूण - २,७५,८५६
--------------
कोट
जिल्ह्यात २ लाख ७५ हजार ८७५ लाभार्थी आहेत. तेवढ्या पॅकिंगची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र सध्या साखर आली असून उर्वरित वस्तू मिळाल्यानंतर दुकानदार एकत्रितरित्या त्याचे वितरण १०० रुपयात करणार आहेत.
- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी