लांजा-साटवलीतील ऐतिहासिक गढीने घेतला मोकळा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-साटवलीतील ऐतिहासिक गढीने घेतला मोकळा श्वास
लांजा-साटवलीतील ऐतिहासिक गढीने घेतला मोकळा श्वास

लांजा-साटवलीतील ऐतिहासिक गढीने घेतला मोकळा श्वास

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१३p१५.jpg-KOP२२L५६१८४ लांजा ः साटवली येथील गढीची स्वच्छता करताना शिवगंध प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य.


ऐतिहासिक गढीने घेतला
साटवलीत मोकळा श्वास
स्वच्छता मोहीम ; दुर्लक्षामुळे ठेवा ढासळतोय
लांजा, ता. १३ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साटवली गढीच्या ठिकाणी शिवगंध प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याने या गढीने मोकळा श्वास घेतला आहे.
तालुक्यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्त्व विभागाचे तसेच स्थानिकांचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत ही गढी अखेरची घटका मोजत आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून साटवलीला महत्व होते.
लांजा तालुक्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या गढीचे संवर्धन व्हावे व वर्तमान पिढीला तालुक्याचा समृद्ध वारसा ज्ञात व्हावा या दृष्टीने दुर्गवीर प्रतिष्ठान, शिवगंध प्रतिष्ठान, लांजा व साटवली, रुण गावातील स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने साटवली किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला स्थानिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी शिवगंध प्रतिष्ठानचे अविनाश जाधव, सुमित गुरव, विशाल कांबळे, राज शिगम, निशांत आचरेकर, जयानंद सुर्वे, आशुतोष विचारे, रुपेश दळवी, अमेय कांबळे, प्रल्हाद साळुंखे, राहूल शिंदे, अमरेश ठाकुरदेसाई, अनुष्का जाधव, तृप्ती चव्हाण, समिक्षा कातकर, महेश चव्हाण, गुरू धाडवे, राजू मोरे, राजन कुंभार, आकाश असोगेकर, प्रणय साळवी, समीर लाड, सोहम गोरे, अमित समगिसकर आदी उपस्थित होते. तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे सिद्धेश मेस्त्री उपस्थित होते. तसेच हेमंत कुंभार, उदय चाळके, राजू शेरे, ओमकार गांगण, विवेक संसारे व प्रसाद भालेकर या स्थानिक मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.